घरलाईफस्टाईललिंबूपाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

लिंबूपाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Subscribe

जाणून घ्या लिंबूपाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला चक्कर येत असल्यास आपण त्या व्यक्तीला लिंबूपाणी देतो. यामुळे त्या व्यक्तीला थोडावेळ तरी बरे वाटते. त्यामुळे कोणत्याही आडाअडचणीला उपयोगी पडणारे लिंबू घरात आवर्जून ठेवतो. मात्र, या लिंबूपाण्याचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया लिंबूपाणी पिण्याचे इतर आरोग्यदायी फायदे.

हृदयाच्या समस्येवर

- Advertisement -

लिंबू पाणी व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत असल्याचे सिद्ध झाले आहे. व्हिटॅमिन सी हृदयाच्या समस्यांपासून मुक्त होतो आणि स्ट्रोकला प्रतिबंधित करतो.

पचन शक्ती वाढते

- Advertisement -

लिंबू, कोमट पाणी आणि मध मिसळून प्यायल्याने पचन शक्ती वाढते.

यकृतासाठी फायदेशीर

लिंबू हे यकृतासाठी खूप चांगले मानले जाते. लिंबू पाणी शरीरात पित्त रस तयार करण्यास मदत करते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

तोंड कोरडे होण्यापासून प्रतिबंधित

लिंबू पाणी प्यायल्याने तोंडात लाळ तयार होते आणि तोंड कोरडे होण्यापासून प्रतिबंधित होते. लिंबाचे पाणी पिण्यामुळे माणसाला ताजेतवाने वाटते आणि श्वास घेण्यास नवीन ऊर्जा मिळते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

तोंडाची दुर्गंधी

बऱ्याचदा आपण जेवण करताना कांदा, लसूण, मुळा यांचे सेवन करतो. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लिंबाचे पाणी प्यायले जाते.

त्वचेवरील डाग

लिंबामध्ये अँटी ऑक्सिंडट गुण असतात. त्यामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास लिंबाचा रस फायदेशीर ठरतो.


हेही वाचा – पायाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -