घरलाईफस्टाईलओठांच्या आकारानुसार लावा लिपस्टिक

ओठांच्या आकारानुसार लावा लिपस्टिक

Subscribe

लिपस्टिकचे प्रकार आणि तुमच्या ओठांचा आकार याचा योग्य ताळमेल साधला तर नक्कीच तुमचे ओठ आकर्षक दिसतील यात शंका नाही. चला तर जाणून घेऊया ओठांच्या आकाराप्रमाणे त्यावर सूट होणारे लिपस्टिकचे प्रकार. तसेच ओठांच्या आकाराप्रमाणे लिपस्टिक कशी लावावी जेणेकरून याविषयी सविस्तर.

लिपस्टिकचे विविध प्रकार

मॅट – या प्रकारात रंगाची तीव्रता जास्त असते, तसेच थोडीशी शाईन असते. मॅट लिपस्टिकमध्ये मॉइस्चरायझरचा फायदा मिळतो. कलर अधिक काळ टिकतो, पण मॅट लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम जरूर लावावा.

सॅटिन – सॅटिन लिपस्टिकला शाईन जास्त असून ओठांवर कलरही लवकर लागतो, पण खूप कमी काळ ओठांवर टिकून असतो, त्यामुळेच वारंवार अप्लाय करावी लागते. मॅट लिपस्टिकपेक्षा सॅटिन लिपस्टिकमध्ये मॉइस्चर जास्त असते.

- Advertisement -

ग्लास – सॅटिन लिपस्टिकपेक्षा लिप ग्लास ओठांवर जास्त काळ टिकून असतो. लिप ग्लॉसमध्ये ग्लिटर असते, तर सॅटिनमध्ये फक्त शाईन असते.

लिप पेन्सिल्स – ओठांना योग्य आकार देण्यासाठी लिप पेन्सिल उपयुक्त आहे. लिप पेन्सिलने ओठ कोरडे पडतात म्हणून ती घेताना नेहमी न्यूट्रल किंवा शिमरी शेडमध्येच घ्यावी. जास्त डार्क शेडची पेन्सिल शक्यतोवर घेऊ नये, कारण त्याने ओठांवर जाडसर थर तयार होतो. त्यामुळे ओठ खूप वाईट दिसतात.

- Advertisement -

लिप स्टेन – लिप स्टेन हा प्रकार नैसर्गिक रंगापासून बनवलेला असतो. त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते, परंतु दिर्घकाळ टिकणारी असल्यामुळे त्याला परत परत लावण्याची गरज भासत नाही. लिप लायनर न लावता ओठांवर डाइरेक्ट अप्लाय करावी. लिप स्टेन पसरत नाही.

ओठांचा आकार

सर्वांच्याच ओठांचा आकार हा रेखीव व प्रमाणबद्ध नसतो. कुणाचे जाड तर कुणाचे बारीक असतात. लिपस्टिक लावण्याच्या काही पद्धती आहेत, ज्याने काही प्रमाणात ओठांना योग्य तो आकार देता येतो.

१. जाड ओठ – ज्यांचे ओठ जाड आहेत त्यांनी नॅचरल लिप लायनरला प्राधान्य द्यावे. मूळ आकार असलेल्या ओठांच्या कडेपासून आतल्या बाजूने लिप लाइनर लावावे, जेणेकरून ओठ बारीक दिसतील.

२. बारीक ओठ – जाड ओठांच्या अगदी विरुद्ध लिप लाइनर ओठांच्या बाहेरील बाजूने लावावे, म्हणजे ओठ थोडे जाड दिसतील. ब्राइट लिपस्टिक्सना प्राधान्य द्यावे.

३. झुकते ओठ – यालाच ड्रिपग लिप्स असेही म्हणतात. ज्यांच्या ओठांच्या बाहेरील कडा झुकलेल्या असतात त्यांनी लायनर बाहेरील कडांना वरच्या दिशेने लावावे.

४. धनुष्याकृती ओठ (बो लिप्स) – ओठांचा मधील भाग हा जाडसर असून कडा बारीक असतात. बाहेरील कडा जास्त टोकदार वाटू नयेत म्हणून थोडासा गोलाकार द्यावा.

लिप मेकअपसाठी काही टिप्स

* सर्वप्रथम ओठांना बोटाने मॉइस्चरायझर, लिप बाम किंवा फाऊंडेशन प्रायमर लावावे.
* त्यानंतर ओठांना लाइट कलरचा कोट द्यावा.
* त्याच रंगाचे लिप लायनर ओठांच्या कडांना लावावे आणि ते बोटाने ब्लेंड करावे.
* नंतर खालच्या ओठाच्या मधल्या भागावर लिप ग्लॉस लावावा. यामुळे ओठ उठावदार आणि रेखीवही दिसतात.
*दररोजच्या मेक-अपसाठी लिपस्टिक निवडताना शक्यतोवर लाइट कलरचीच निवडावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -