घरताज्या घडामोडीमास्कमुळे होत आहेत दात खराब, डेंटिस्टनी सांगितले उपाय

मास्कमुळे होत आहेत दात खराब, डेंटिस्टनी सांगितले उपाय

Subscribe

मास्क लावलेला असल्याने बरेच जण किती तरी वेळ पाणी पिणे देखील विसरतात. यामुळे तोंडात छोटे छोटे जंतु जमा होण्यास सुरुवात होते व त्यामुळे तोडांतून वास येतो.

कोरोना विषाणूपासून आपले संरक्षण करण्यासाठी मास्क घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे आता डबल मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार डबल मास्क कोरोनापासून सर्वाधिक संरक्षण होते. मात्र डबल मास्क लावताना आपल्या ओरल हायजिनकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे डेंटिन्सटने सांगितले आहे. सतत मास्क लावल्याने दात खराब होण्याची शक्यता असल्याचे एक्सपर्टनी सांगितले आहे. (Masks affect oral hygiene said dentist) 

खूप वेळ डबल मास्क घातल्यामुळे तोंड सुकते आणि डिहायड्रेशन होते, असे चेन्नईच्या डॉ. ए रामचंद्रन रुग्णालयाच्या निदेशक आणि सल्लागार पेरियोडोंटिस्ट विनीता रामचंद्र यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. सामान्यत: लोक आपल्या तोंडानी श्वास घेतात मात्र डबल मास्क लावल्याने श्वास घेण्याची प्रक्रिया कमी होते. त्यामुळे तोंड सुकते. मास्क लावलेला असल्याने बरेच जण किती तरी वेळ पाणी पिणे देखील विसरतात. यामुळे तोंडात छोटे छोटे जंतु जमा होण्यास सुरुवात होते व त्यामुळे तोडांतून वास येतो.

- Advertisement -

डॉक्टर विमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या डॉक्टरांनी हे जाणून घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्वे केला त्यात असे समोर आले की, कोरोना महामारीच्या काळात अनेक लोक डेंटिस्टकडे जात आहेत. त्याचप्रमाणे मास्कचा परिणाम ओरल हायजिनवर होत असल्याचे जर्नल अँन्ड प्रिवेंटिव डेंटिस्टिमध्ये छापलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे.

- Advertisement -
Morsa Images / Getty Images

पुढे डॉक्टर विमल यांनी असे म्हटले आहे की, मास्क लावल्याने तोंडातून दुर्गंधी येते, दातांच्या हिरड्यांमध्ये गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यावर एक अभ्यास करण्याची गरज आहे. मास्क लावणारे आणि मास्क न लावणारे यांच्यावर हा अभ्यास करता येईल.


हेही वाचा – Corona Vaccine: लसीचा एक डोस कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतो?

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -