घरलाईफस्टाईललहानपणीच होणार डोळ्याच्या आजाराचे उपचार

लहानपणीच होणार डोळ्याच्या आजाराचे उपचार

Subscribe

प्टोसिस (डोळ्याचे पाते खाली येणे) शस्त्रक्रियेचा लाभ आता ५ वर्षांखालील मुलांनाही होणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे कायमस्वरूपी दृष्टीदोष टाळण्यासाठी ५ वर्षांखालील मुलांची शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

जेव्हा तुमच्या डोळ्यांचे वरील पाते काहीसे खाली येते किंवा त्यामुळे तुमच्या डोळ्याची बाहुली झाकली जाते तेव्हा त्या अवस्थेला प्टोसिस किंवा पाते खाली येणे म्हणतात. ही अवस्था जन्मत:च असेल तर तिला कंजेनिटल (जन्मजात) प्टोसिस म्हणतात. ही अवस्था आयुष्यातील नंतरच्या टप्प्यांवरही विकसित होऊ शकते. या अवस्थेची तीव्रता किती आहे यावर यामुळे येणारा दृष्टिदोष अवलंबून असतो. काही वेळा पाते खाली आल्यामुळे दृष्टी पूर्णपणे अडते (ब्लॉक होते) किंवा कमी होते. पाते खाली आल्यामुळे डोळ्याची बाहुली किती प्रमाणात झाकली गेली आहे त्यावर ते अवलंबून असते. सध्याच्या शस्त्रक्रियात्मक उपचारांमध्ये थोडा बदल केला असता किंवा तुमच्या डोळ्यांच्या वरील पात्यावर काही उपचारात्मक प्रक्रिया केली असता प्टोसिस किंवा पाते खाली येण्याची अवस्था लक्षणीयरित्या सुधारली जाऊ शकते. भारतातील एस्थेटिक क्लिनिक्समध्ये प्रसिद्ध फेशिअल प्लास्टिक सर्जन डॉ. देबराज शोम आणि अन्य संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसारयासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या तंत्रांनी साधला जाणार नाहीअसा परिणाम नवीन तंत्रांनी साधला जाऊ शकतो.

दृष्टिदोष निर्माण होण्याचा धोका

तीव्र स्वरूपाच्या प्टोसिससह जन्माला आलेल्या बाळांवर वेळेत करेक्टिव शस्त्रक्रिया झाली नाहीतर कायमस्वरूपी दृष्टिदोष निर्माण होण्याचा धोका असतो. दृष्टीवर परिणाम होणार नाही इतपत सौम्य स्वरूपाचा प्टोसिस असलेल्या मुलांबाबत ती ५ वर्षांची होईपर्यंत थांबणे शक्य असते पण मुलांना कायमस्वरूपी दृष्टिदोष येऊ नये असे पालकांना वाटत असेल तर शस्त्रक्रियेला पर्याय नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे,” असा इशारा डॉ. शोम यांनी दिला.

- Advertisement -

शस्त्रक्रियेची पद्धत वेगळी

डॉ. शोम यांच्या परिवर्तित तंत्रामध्ये टार्सो-फ्रण्टल स्लिंग (कपाळाच्या स्नायूला एक बॅण्ड लावणे) शस्त्रक्रिया करून खाली येणारे पाते वर उचलले जाते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या पात्यांच्या दुमडीमधील (क्रीझ) सममिती कायम राखण्यासाठी पात्याला दुमड घातली जाते. प्टोसिस बरा करण्यासाठी यापूर्वीही अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या सामान्यपणे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांपेक्षा ही पद्धत वेगळी आहे. यामध्ये काळजीपूर्वक घडवलेल्या पाते दुमडण्याचा (आयलिड क्रीझ) समावेश आहे. यामुळे पाती अधिक प्रमाणबद्ध दिसतात आणि दोन्ही डोळे अधिक समतोल दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -