घरताज्या घडामोडीtype 2 diabetes: पुरेशी झोप न लागणं देतेय टाईप २ डायबेटीसला आमंत्रण

type 2 diabetes: पुरेशी झोप न लागणं देतेय टाईप २ डायबेटीसला आमंत्रण

Subscribe

टाईप २ डायबेटीस मेलीटस (टी२डीएम) ग्रस्त ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांना स्लीप अप्नीयाचे निदान झाले असल्याचं रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडिया (आरएसएसडीआय)ने प्रकाशित केलेल्या दस्तऐवज नमूद करण्यात आले आहे. रेसमेड चे वैद्यकीय कामकाज- आशिया आणि लॅटीन अमेरिका प्रमुख डॉ. सिबाशिष डे यांनी सांगितले की, ऑबस्ट्रक्टीव्ह स्लीप अप्नीया या विकाराला ओएसए देखील संबोधण्यात येते. हा झोपेतील श्वासोच्छवासासंबंधी विकार असून त्यात शरीरातील वरच्या भागात असलेल्या श्वसन मार्गात अडथळा निर्माण होऊन रात्रीच्या चांगल्या झोपेचा भंग होतो. ओएसए विकारात सामान्यपणे आढळून येणारं लक्षण म्हणजे व्यक्तिचे घोरणे. परिणामी, सकाळी उठल्यावर रुग्णाला थकवा जाणवतो. त्याची शक्ती गळाल्याने कामाची उत्पादकता कमी होते. ऑबस्ट्रक्टीव्ह स्लीप अप्नीया बराच काळ टिकल्यास टाईप २ मधुमेह डोकं वर काढू शकतो. त्याचप्रमाणे श्वासोच्छवास आणि लठ्ठपणाचा त्रास होतो.

टी२डीएम ग्रस्त व्यक्तींवर ओएसए प्राथमिक अवस्थेत असताना तपासणी, निदान आणि उपचार झाल्यास श्वसन विकारांचं समूळ उच्चाटन शक्य असते. त्यानंतर जीवनाचा दर्जा सुधारत जातो. टी२डीएम आणि ओएसएग्रस्त रुग्णांना चांगल्या देखभालीसह पद्धतशीर तपासणी, निदान आणि उपचारात डायबेटोलॉजिस्ट, एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि झोपेचे औषध देणाऱ्या तज्ञांकडून एकत्रित मदत महत्त्वाची असल्याचे रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटीस इन इंडिया अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालात पुढे टाईप २ डायबेटीस मेलिटस (टी२डीएम) सोबत ओएसएग्रस्त रुग्णामध्ये तपासणीच्या महत्त्वावर जोर देण्यात आला, ओएसएग्रस्त रुग्णाने नियमितपणे टाईप २ डायबेटीसची तपासणी करून घ्यावी असे त्यात सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

द लान्सेटच्या २०१९ अहवालानुसार जगभरातील सुमारे अब्जावधी लोक अल्प ते गंभीर स्वरूपाच्या ओएसएने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली. याच लोकांमध्ये टी२डीएम विकसीत होण्याची शक्यता असते. २०२१ आरएसडीआय दस्तावेजात अधोरेखित करण्यात आले आहे की, ओएसएवर वेळेवर उपचार न झाल्यास त्याच्या अस्तित्वामुळे आणि गंभीर स्वरूपाने ग्लासेमिक नियंत्रण (एचबीए1सी स्तर) बिघडतो असे सध्याचे वैद्यकीय साहित्य दर्शवते. त्यामुळे आरएसएसडीआय शिफारस करते की, वेळेवर तपासणी, निदान आणि वैद्यकीय हस्तक्षेप हे ओएसए आणि टाईप २ डायबेटीस रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात.

त्याशिवाय, लठ्ठ व्यक्तिंमध्ये ओएसए असल्याची लक्षणे दिसून येतात. जसे की, घोरण्याची सवय, अप्नीया अनुभव आणि दिवसाढवळ्या झोप येणे. ही लक्षणे आढळल्यास टी२डीएम तपासणी करून घ्यावी. भारतात १०० पैकी ७ लोक टाईप २ डायबेटीस मेलिटसने ग्रस्त असतात. याचा अर्थ जवळपास ७७ दशलक्ष लोक २०४५ पर्यंत हा आकडा अंदाजे दुप्पट होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या झोपेच्या नमुन्याची नियमित तपासणी करून घ्या. नियमितपणे व्यायाम करा, किमान डाएट पाळा आणि शरीरातील साखरेची पातळी चांगल्याप्रकारे नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित मधुमेहाची औषधे घेणे महत्त्वाचे ठरते.

- Advertisement -

हेही वाचा – vitamin c deficiency: शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची ‘ही’ आहेत महत्त्वाची लक्षणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -