Monsoon Healthy Diet: पावसाळ्यात आजाराला दूर ठेवण्याचा डाएट प्लॅन, वाचा

read monsoon healthy diet don't eat spicy and oily food
Monsoon Healthy Diet: पावसाळ्यात आजाराला दूर ठेवण्याचा डाएट प्लॅन, वाचा

अनेकांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. कारण कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा गरमीतून दिलासा देतो. पावसाळ्यात प्रत्येकाला गरम चहासोबत भज्जी किंवा तळलेले पदार्थ खायला खूप आवडतात. तसेच काहींना पराठे खाण्याची आवड असते. पण पावसाळा हा येताना अनेक आजार घेऊन येत असतो. या ऋतूत जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे शरीरासाठी सुरक्षित नसते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमजोर पडते. त्यामुळे अशा परिस्थिती स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि ऋतूचा आनंद घेण्यासाठी डाएटमध्ये हेल्थी गोष्टीचा समावेश केला पाहिजे. त्या कोणत्या ते जाणून घ्या.

ओट्स – झटपट बनणाऱ्या पदार्थापैकी एक म्हणजे ओट्स. यात खूप पोषक तत्व असतात. तुम्ही साध्या ओट्सच्या जागी यात फळं मिसळून जास्त न्यूट्रिशस बनवू शकता. तुम्ही यात केळं, ब्लूबेरी, खजूर, काजू आणि बदाम मिक्स करून ओट्स खाऊ शकता. त्यातून फक्त पोषक तत्व मिळते असे नाही तर खूप वेळासाठी पोट भरले असल्यामुळे भूकेची जाणीव होत नाही.

सफरचंद आणि अ‍ॅव्होकाडो स्मूदी – मान्सूनचा आनंद घेण्यासाठी सफरचंद आणि अ‍ॅव्होकाडोची स्मूदी सर्वात जबरदस्त पर्याय आहे. यासाठी १ अ‍ॅव्होकाडो, २ सफरचंद, केळ दूध किंवा नारळाचे पाणी घ्या. एका भांड्यात सर्व गोष्टी घालून स्मूदी बनवा. ही स्मूदी तुम्हाला जेव्हा केव्हा वाटले तेव्हा पिऊ शकता.

पॅनकेक – पेनकेक हेल्थी असून खूप स्वादिष्ट देखील असतात. यामध्ये केळ, ब्लूबेरी आणि अन्य फळं टाकून ही बनवू शकता. तसेच तुम्ही तुमच्या आवडतीचे फळ देखील पॅनकेकच्या बॅटरमध्ये टाकू शकता.

चेरी आणि रसदार स्मूदी – पावसाळ्यात फळांची स्मूदीचे सेवन करण्यामुळे तोंडाची चवीसोबत आरोग्य देखील निरोगी राहते. चेरी आणि रसदार स्मूदी बनवण्यासाठी ३०० ग्रॅम चेरी रसदार, २०० ग्रॅम योगर्ट, १ कप दूध, १ चमचा मध आणि बर्फ घ्या. मध सोडून सर्व सामग्री ब्लँडरमध्ये टाकून स्मूदी बनवा. मग तयार झालेल्या स्मूदीमध्ये मध घालून पिऊ शकता.

दरम्यान संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. हेल्थी पदार्थ खा. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये फ्रूट चाट योग्य पर्याय आहे. तुमच्या आवडचे फळं कापून त्यावर काळी मिरी पावडर आणि मीठ घालून खाऊ शकता. तसेच संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ड्राय फ्रूट्स, चने घाऊ शकता. चहा किंवा कॉफी ऐवजी ताक प्या.