घरलाईफस्टाईलकपडे खरेदी करताना हे ही लक्षात ठेवा

कपडे खरेदी करताना हे ही लक्षात ठेवा

Subscribe

आपण जेव्हा आपल्याला जे आवडते ते खरेदी करतो. मग नंतर असे वाटते, अरे त्या पैशांमध्ये आपल्याला दुसरी चांगली गोष्ट मिळू शकत होती. मात्र, तेव्हा उशीर झालेला असतो. अशावेळी लक्षात ठेवा या काही टिप्स…

*कपडे खरेदी करताना कितीही ब्रॅण्डेड कपडे असो, मात्र ते तुमच्या फिटिंगला व्यवस्थित येते की नाही हे घालून पाहिल्याशिवाय घेऊ नयेत.

- Advertisement -

*नुसते चकचकीत कपडे कधी-कधी तुमच्या व्यक्तिरेखेला बोगस करू शकतात.

*जर तुम्ही वेस्टर्न कपडे खरेदी करत आहात व ते तुम्ही पहिले कधी घातले नसेल तर खरेदी करण्यापूर्वी घालून पाहा ते तुम्हाला सूट करतात का? त्याच्या आधी घेऊ नका.

- Advertisement -

*दुसर्‍यांनी घातलेले कपडे त्यांना चांगले दिसतात तर ते तुम्हालाही चांगले दिसतील, असे नाही. त्यासाठी तुमच्या व्यक्तिरेखेला चांगले दिसतील व ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट वाटेल, अशाच कपड्यांची निवड करावी.

*जिन्स घेत असल्यास जी तुमची साईज आहे ती तुम्हाला कधी छोटी किंवा मोठीही होऊ शकते व एकदा का घेतली तर परत करता येत नाही म्हणून ती ट्राय करावी आणि मगच घ्यावी.

*तसेच कपडे खरेदी करताना तो टी-शर्ट, ड्रेस तितक्याच किमतीत मिळतो की त्यापेक्षा कमी दरात दुसर्‍या दुकानात मिळतोय का याची पहिली पडताळणी करून पहा.

*एकाच पॅटर्नचे चार-पाच ड्रेस घेऊ नका.

*नेहमी वेगवेगऴ्या स्टाईलचे कपडे घालायला शिका. त्यामुळे तुम्हाला दररोजच्या जीवनातून वेगळा अनुभवही मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -