घरलाईफस्टाईलऑर्गेनिक फार्मिंगसाठी पालघर उत्तम पर्याय

ऑर्गेनिक फार्मिंगसाठी पालघर उत्तम पर्याय

Subscribe

सध्या अनेकांना दैनंदिन व्यवसाय, नोकरी-धंद्याबरोबर फावल्या वेळेत सेंद्रीय शेती (ऑर्गेनिक फार्मिंग) करण्याची इच्छा असते. सध्याच्या काळात रासायनिक शेतीचा अतिवापर केल्यामुळे त्यातून उत्पादित होणार्‍यात अत्यंत विषारी कृषी मालांचे दुष्परिणाम मानवी जीवनावर होऊ लागले आहेत. घरोघरी आता रासायनिक शेतीचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. म्हणूनच सेंद्रीय शेतीकडे लोकांचा ओढा वाढत चालला आहे. पालघर जिल्हा या सेंद्रीय शेतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. ब्लीस होम्सने या ठिकाणी याकरता खास योजना तयार केल्या आहेत. त्याला प्रतिसादही मिळत आहे.

ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा नावारूपास आला. नवीन जिल्हा झाल्यापासून या जिल्ह्यात पायाभूत सुविधांसह विकासाच्या अनेक गोष्टी उभारण्यात येऊ लागल्या. निसर्गाने पालघर जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. 70 कि.मी. चा समुद्र किनारा, गर्द जंगले, पर्वतरांगा, खळळते धबधबे, गड किल्ले अशा विविध अंगांनी संपूर्ण जिल्हा नटलेला आहे. अशा निसर्गसंपन्न आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक, पारंपरिक कला यांनी संपन्न असलेला हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारुपाला येण्यासाठी ठोस, आखीव नियोजन करण्यात येत आहे. पालघर जिल्हा हा मुंबईपासून अत्यंत जवळ आहे. मुंबईहून इथे येण्यास दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे, ही या जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे गड, समुद्रकिनारे, धरणे, जंगले या गोष्टी इथे मोठ्या प्रमाणात आहेत.

जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पर्यटनास समृद्ध अशी विविध स्थळे आहेत. जव्हार तालुक्यामध्ये शिरपा माळ, दाभोसा आणि हिरडपाडा धबधबा, जामसर, भोपटगडचा गड, डहाणू तालुक्यात डहाणूचा समुद्र किनारा, बोर्डी, चिंचणी, महालक्ष्मी मंदीर, तलासरीमध्ये जाई विलास पॅलेस, पालघर तालुक्यात सातिवली, कोकनेर, मेघराज मंदिर, जलसर, वसईतील अर्नाळा, बुद्ध स्तूप-(सोपारा), मोखाड्यातील सूर्यमाळ-सनसेट पॉईंट, देवबंध, वाशाळा, ओसरविरा तलाव, वाडा तालुक्यातील कोहोई किल्ला अशी कित्येक पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.

- Advertisement -

जव्हार तालुक्याला पालघर जिल्ह्यातील महाबळेश्वर म्हणून संबोधले जाते. आदिवासी लोकवस्ती असलेला हा दुर्गम भाग आहे. इथे येणार्‍या पर्यटकांना आदिवासी बंधूंचे ग्रामीण जीवन, तेथील संस्कृती, परंपरा यांचा जवळून अनुभव घेता येतो. शिवाय या लोकांशी संवाद साधण्याचीही संधी मिळते. येथील तारपा नृत्याचेही सायंकाळी आयोजन केले जाते. याबरोबरच या लोकांनी स्वत: बनविलेल्या कलाकृतीच्या वस्तू पर्यटकांना आवडल्यास विकत घेता येतात. डहाणू, बोर्डी, चिंचणी या समुद्र किनार्‍याजवळून जाणार्‍या रस्त्यावरुन सफर करणे हीदेखील पर्यटकांसाठी पर्वणी ठरते. हे किनारे सुरुची झाडे, नारळ व फळाफुलांनी बहरलेले आहेत. कृषी पर्यटन ही संकल्पना रुजविण्यास इथे प्रचंड प्रमाणात वाव आहे. चिकू महोत्सवासारखे उपक्रम कृषी पर्यटनास चालना देणारे ठरतील. याठिकाणी चिकूपासून बनणारे पदार्थ पर्यटकांना दाखविता येऊ शकतील. अशा महोत्सवाद्वारे स्थानिक लोकांच्या कला-कौशल्याच्या वस्तू, चिकूपासून बनणारी उत्पादने दाखविता येतील. याबरोबर चिकूच्या बागांमध्ये फिरता येईल.

या ठिकाणी अजूनही शेकडो कि.मी. पर्यंतचे भूखंड हे मोकळे आहेत. अजूनही त्यावर विकास झाला नाही, म्हणूनच निसर्गाचे मूळ स्वरूप या ठिकाणी अद्याप कायम आहे. सध्याच्या सिमेंट काँक्रिटच्या जंगलात पालघर जिल्हा तसा निराळाच आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणार्‍या या जिल्ह्यात हळूहळू जिल्ह्याबाहेर नागरिक गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करू लागले आहेत. मुंबईकरांची कर्मभूमी मुंबई असली तरी रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडीशी उसंत मिळावी, निसर्गाच्या सान्निध्यात एक-दोन दिवस राहून क्षीण घालवण्यासाठी मुंबईकर लोणावळा, खंडाळा येथील निसर्गरम्य ठिकाणी सेकंड होम घेतात किंवा छोटीशी जमीन घेऊन तिथेच फार्म हाऊस बांधतात. सुटीच्या दिवशी स्वत:ची पारसबाग सजवतात. त्यावेळी अधिकाधिक काळ वनस्पतींच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न करतात आणि पुन्हा आपल्या कामासाठी मुंबईत परतात, मात्र आता या सर्व उद्देशांकरता मुंबईकरांसाठी पालघर जिल्हाही खुणावू लागला आहे. वाडा, मोखाडा, जव्हार, तलासरी, विक्रमगड या भागांनाही लोणावळा, खंडाळा यासारख्या निसर्गरम्य ठिकाणांचा दर्जा आहे. त्यामुळे मुंबईकर छोटे-मोठे फार्म हाऊस बांधण्यासाठी या ठिकाणांचाही विचार करत आहेत. अगदी मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणांमुळे साहजिकच वेळ आणि पैशाची बचत होते.

- Advertisement -

सेकंड इन्व्हेस्टमेंट म्हणून कुणी पालघर जिल्ह्याचा विचार करत असतील, तर त्यांच्याकरता ‘ब्लीस होम्स’ यांच्याशिवाय अन्य कुणीही योग्य मार्गदर्शन करू शकणार आहे. ब्लीस होम्सने निसर्गाने नटलेल्या या जिल्ह्यांत १३५ रुपये प्रति चौ.फूट इतक्या कमी दरात प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत. मोकळा भूखंड उपलब्ध करून दिल्यावर अनेकजण त्या ठिकाणी टुमदार बंगले उभारत आहेत. सेकंड होम म्हणून त्याचा वापर करतात. अल्प दरात भूखंड मिळाल्याने या ठिकाणची एकूण गुंतवणूक तुलनेने स्वस्त होते. अशा प्रकारे मोकळे भूखंड अनेकांना सेंद्रीय शेतीसाठीही (ऑर्गेनिक फार्मिंग) खुणावत आहेत. सध्याच्या काळात रासायनिक शेतीचा अतिवापर केल्यामुळे त्यातून उत्पादित होणार्‍या अत्यंत विषारी कृषी मालांचे दुष्परिणाम मानवी जीवनावर होऊ लागले आहेत. घरोघरी आता रासायनिक शेतीचे परिणाम जाणवू लागले आहेत. म्हणूनच सेंद्रीय शेतीकडे लोकांचा ओढा वाढत चालला आहे. पालघर जिल्हा या सेंद्रीय शेतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.

ब्लीस होम्सने या ठिकाणीही खास योजना तयार केल्या आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. ब्लीस होम्स नुसते भूखंडच उपलब्ध करून देत नाही, तर त्यावर सेंद्र्रीय शेती निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देते. याशिवाय काही जणांचा काऊ फार्मिंग, फोल्ट्री फार्मिंग, फिश फार्मिंग, शेळी पालन करण्याकडे ओढा असतो. यासाठी मात्र स्वस्त दरात मोकळे भूखंड उपलब्ध होणे गरजेचे आहे. बिल्झ होम्सकडून अशांनाही आवश्यक तितका भूखंड उपलब्ध करून दिला जातो. तसेच असा व्यवसाय करू इच्छिर्‍यांना ‘ब्लीस होम्स’ संस्थेतर्फे मार्गदर्शनही केले जाते. सेंद्रीय शेती उत्पादनांना सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अशा मालाचे उत्पादन वाढवणे गरजेचे बनले आहे. म्हणून ब्लीस होम्स ग्राहकांना मोकळे भूखंड देऊन त्यांना हवी असलेली सेंद्रीय शेतीदेखील फुलवण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे सेंद्रीय शेती उत्पादनांची नेमकी बाजारपेठ कुठे आहे, त्याविषयी मार्गदर्शनही करून देते. त्यामुळे ज्यांना कुणाला पालघर जिल्ह्यात या करता गुंतवणूक करायची असेल, त्यांचे स्वागत आहे.

– जावेद आफ्ताब, संचालक, ब्लीस होम्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -