घरलाईफस्टाईलस्टाईल आणि ट्रेंडमध्ये असलेले फ्रॉक स्टाईल कुर्ते

स्टाईल आणि ट्रेंडमध्ये असलेले फ्रॉक स्टाईल कुर्ते

Subscribe

लहानपणीच्या फ्रॉक्समध्ये थोडासा बदल होऊन फ्रॉक स्टाईलचे कुर्ते आता बाजारात आलेत. फ्रॉक्स नॉस्टॅल्जिया जागवणार्‍या या कुर्त्यांचं आपलं स्टाईल स्टेटमेंटही भन्नाट आहे.

शाळेतले ते टिपिकल बंदवाले टॉप्स मिस न करणारी मुलगी शोधून सापडणार नाही: छानशी फ्रिल, मागे बांधलेले बंद असे फ्रॉक दिसतातही खूप क्यूट. आता लेगिंग्ज किंवा जीन्सवरही असे फ्रॉक घालण्याची फॅशन परत आलीय. बाजारात एक चक्कर टाकलीत तर फ्रॉक स्टाईलनं शिवलेल्या कुर्त्यांची भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल. हे फ्रॉक स्टाईल कुर्ते सिल्क, कॉटन, जॉर्जेट अशा कोणत्याही मटेरिअलमध्ये बनवलेले असले तरी आरामदायी असतात. त्यातही अर्थात कॉटनचे जास्त सुटसुटीत असतात. जाडसर कॉटनपासून बनवलेले कुर्ते जास्त ट्रेंडमध्ये आहेत.

नेक डिझाईंस-
या कुर्त्यांमंध्ये नेहमीची कॉलर, स्टँड कॉलर, कुर्ता पट्टी, डिझायनर किंवा एम्ब्रॉयडरी केलेली कॉलर,डीप नेक, बटनांशी सुशोभित केलेले नेक, त्याशिवाय मोती, दोरी नेक यांची चलती आहे. वेगवेगळ्या नेक डिझाईंसमुळे या फ्रॉक कुर्त्यांची रंगत आणखी खुलून दिसते.

- Advertisement -

स्लीव्हज-
थ्री फोर्थ स्लीव्हज सध्या खूप फॅशनमध्ये आहेत. बॉडिगार्ड सिनेमापासून करिनानं आणलेली ही फॅशन नंतर सोनाक्षीसारख्या हिरोईन्सनीही चालू ठेवली आहे. फ्रॉक कुर्त्यावरही थ्री फोर्थ स्लीव्हज सुरेख दिसतात. त्याशिवाय बलून स्लीव्हज, स्लीव्हलेस, मेगा स्लीव्हज, फूल स्लीव्हज, क्रोशाचे स्लीव्हज छान दिसतात. वूलन तसंच फ्रिलचे स्लीव्हज फ्रॉक स्टाईलला सूट होतात.

रंग-
सध्या सगळीकडेच मल्टीकलर्सचा ट्रेंड आहे. तोच या स्टाईलमध्येही दिसून येतो. जांभळा, शॉकिंग यलो असे गडद रंगही मुली बिनधास्तपणे कॅरी करताना दिसतात. काळा रंग तर ऑल टाईम फेव्हरेटमध्ये येतो.

- Advertisement -

ओढणी-
फ्रॉक कुर्त्यावर ओढणी घ्यायची फारशी गरज नसते. तरीही घ्यायची झाल्यास स्टोलला पसंती द्यावी. नेटच्या लांब ओढण्याही, शेडेड ओढण्याही यावर खूप वापरल्या जातात. मात्र, खूप जाड आणि रुंद ओढण्या यावर चांगल्या दिसत नाहीत.

डिझाईंस-
या स्टाईलच्या कुर्त्यांना असलेली अम्ब्रेला स्टाईल खूप क्यूट दिसते. थोड्या जाड असाल तर अ‍ॅपल शेप कुर्ता म्हणजेच खालचा कट गोलाकार असलेला कुर्ता छान दिसेल. त्याशिवाय पार्टिशन डिझाईनही आहे. त्यात कुर्त्याला मधोमध दोन भाग करून त्यातल्या एकावर सलवारला मॅचिंग किंवा दुसरच डिझाईन केलेलं असतं. साईड डिझाईनही फॅशनमध्ये आहे. साईड डिझाईन, बॉटमला केलेलं काम आणि त्याला मोठ्या बॉर्डर्सची जोड, अशी कॉम्बिनेशन्सही हिट आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -