घरलाईफस्टाईलया घरगुती उपायांमुळे सर्दी खोकला, घशातील खवखव पासून मिळेल आराम

या घरगुती उपायांमुळे सर्दी खोकला, घशातील खवखव पासून मिळेल आराम

Subscribe

कोरोनाची तिसरी लाट धडकली असून देशभरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच सध्या कोरोनाचा वेरियंट ओमीक्रॉनने धूमाकूळ घातला आहे. सर्दी खोकला ताप घशातली खवखव ही ओमीक्रॉनची प्रमुख लक्षण आहेत. पण औषधोपचारांबरोबरच घरगुती उपायांनीही सर्दी खोकला आणि घशातील खवखवीपासून आराम मिळतो. ते कोणते उपाय आहेत ते बघूया.

गरम पाणी- गरम पाणी पिल्याने सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळे होते. सायनसचा त्रास कमी होतो. सर्दी खोकला झाल्यावर सायनस आणि गळ्यात म्युकर मेंब्रेन जमा होते. गरम पाणी प्यायल्याने ते ब्लॉकेजस उघडतात. घशातील खवखवही थांबते. पण यासाठी एकाच घोटात पाणी न पिता हळू हळू पाणी प्यावे. गरम पाण्यात हळद टाकून ते उकळून प्यायल्यानेही सर्दी पडशापासून आराम मिळतो.

- Advertisement -

रक्तभिसारण सुधारते- गरम पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधरते. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटण्यामागेही हेच कारण आहे. सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेकश्नमध्ये गरम पाणी प्यायलास ताप लवकर उतरतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

बॉडी डिटॉक्स-गरम पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ लघवीवाटे शरीराबाहेर फेकले जातात. योग्य प्रमाणात पाणी पिणे किडनीसाठी फायदेशीर असते. तसेच गरम पाणी प्यायल्याने नर्व्हस सिस्टमवर सकारात्मक परिणाम होतो. मूड फ्रेश राहतो.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -