घरCORONA UPDATEGuidelines for Home isolation : होम क्वारंटाईनबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी; काय...

Guidelines for Home isolation : होम क्वारंटाईनबाबत केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी; काय आहेत सूचना?

Subscribe

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अनेक नियमांत बदल केले आहेत. यात सर्वात मोठा बदल होम क्वारंटाईनच्या गाईडलाईन्समध्ये करण्यात आलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य / लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठीच्या होम क्वारंटाईन्सबाबत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार कोरोनाबाधितांच्या आयसोलेशनचा कालावधी तीन दिवसांनी कमी केला आहे. याआधी 10 दिवसांचे आयसोलेशन अनिवार्य करण्यात आले होते. होम क्वारंटाईनच्या या नव्या गाईडलाईन्स सर्व राज्यांनी तातडीने लागू करण्याचे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.

होम क्वारंटाईन्सबाबत नव्या गाईडलाईन्स

१) होम क्वारंटाईन असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना किमान सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. परंतु ज्यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप आलाच नसेल अशा रुग्णांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपेल. होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा चाचणी घेण्याची गरज नाही.

- Advertisement -

२) वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईनची परवानगी दिली जाईल.

३) सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच उपचार घेतील, मात्र यासाठी घरात प्रॉपर वेंटिलेशन असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

४) रुग्णांना ट्रीपल लेअर मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

५) रुग्णांना आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थ खाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

६) लक्षणे नसलेल्या आणि सौम्य-लक्षणे असलेल्या रुग्ण ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93% पेक्षा जास्त आहे त्यांना होम क्वारंटाईन राहण्याची परवानगी असेल.

७) एचआयव्ही बाधित किंवा प्रत्यारोपण झालेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी दिली जाईल.

८) रुग्णाला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉइड्स, सीटी स्कॅन आणि छातीचा एक्स-रे करण्यास मनाई आहे.

९) सौम्य आणि लक्षणे नसलेले रुग्ण जे होम आयसोलेशनमध्ये असतील त्यांना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाच्या सतत संपर्कात रहावे लागेल, ज्यामुळे त्यांची चाचणी करण्यास आणि गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात बेड वेळेवर मिळण्यास मदत होईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -