‘या’ व्हिटामीन्सवर अवलंबून असते तुमची तब्येत आणि मूड

व्हिटामीन्स म्हणजे शरीरासाठी आवश्यक असलेले घटक. याच व्हिटामीन्समुळे रक्तवाहीन्या मजबूत होतात. त्यामुळे शरीराराला वाढीसाठी आवश्यक पोषण मिळते. एवढेच नाही तर याच व्हिटामीन्सवर तुमची तब्येत आणि मूडही अवलंबून असतो. व्हिटामीन्सचे A,B,C, D, E, K असे प्रकार आहेत. तरी यात मुख्य भूमिका बजावत ते व्हीटामीन सी आणि डी.

कारण व्हिटामीन सी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करते. शरीरात अँटी ऑक्सीडेंटच्या रुपात कार्य करते. पण थंडीत अनेकजण व्हिटामीन सी युक्त पदार्थ खाणे टाळतात. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. त्यामुळे सतत व्हायरल आजारांचा सामना करावा लागतो. भूक मंदावते. चिडचिडपणा वाढतो. वजन कमी होतं. सतत थकवा जाणवतो. हात पाय दुखायला लागतात. व्हिटामीन सी हे महत्वाचे अँटी ऑक्सीडेंट आहे जे शरीरात कँन्सर आणि इतर आजार निर्माण करणाऱ्या फ्री रेडिकल्सपासून बचाhव करते. जर शरीरात याची कमतरता निर्माण झाली तर कॅन्सर सारखा आजार होण्याचा धोका वाढतो. तसेच व्हिटामीन सीमध्ये असvitamin लेल्या अँटी ऑक्सीडंट घटकांमुळे हृदयासाठी लाभकारक आहे. त्यामुळे हृद्याच्या आणि श्वसनाशी निगडीत तक्रारी दूर होतात.

व्हिटामीन सी बरोबरच व्हिटामीन डी हे शरीरासाठी अत्यावश्यक व्हिटामीन आहे. हाड मजबूत करणे दात मजबूत करणं हे व्हिटामीन डी करतं. सूर्यकिरणांतून मुबलक व्हिटामीन डी मिळते. तसेच अंडी मध्येही व्हिटामीन डी असते. व्हिटामीन डि ची कमतरता निर्माण झाल्यास. चिडचिड होते. उदास वाटत. यामुळे जर तुमचेही मूड कधी कधी अचानक बदलत असतील तर हार्मोन्सबरोबर तुमच्या शरीरात व्हिटामीन कमी झाले आहेत हे समजून जावं आणि योग्य आहार घ्यावा.