दिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवनला डच्चू मिळण्याची शक्यता, आयपीएल २०२२ साठी दिल्लीची मोठी रणनिती

दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंतला कर्णधार कायम ठेवण्याची शक्यता..

आयपीएलचं चौदावं हंगाम संपलं असून आता आयपीएल २०२२ वर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आहेत. परंतु आयपीएल २०२२ साठी दिल्लीने आता मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवनला डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अनेक मोठे खेळाडू ऑक्शनसाठी उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वीच दिल्लीमध्ये रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. ऑक्शनसाठी शिखर धवनचं नाव सर्वात आघाडीवर असल्यामुळे त्याला रिटेन करणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

दिल्ली कॅपिटल्समध्ये ऋषभ पंतला कर्णधार कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर पृथ्वी शॉ आणि तिसऱ्या क्रमांकावर शिमरॉन हेटमायरला ठेवण्याचा विचार सुरू आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ऋषभ पंतने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला पुढच्या सामन्यात कर्णधार कायम ठेवणार असल्याचं सांगितलं जातंय. परंतु या स्थितीमध्ये शिखर धवनला कुठेच संधी मिळल्याचं दिसत नाहीये.

दिल्लीच्या संघात येण्यापूर्वी शिखर हैदराबादच्या संघाकडून खेळला आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे त्याला गब्बर देखील म्हटलं जातं. आयपीएलमध्ये धवनने १९२ सामन्यांत ५ हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे आयपीएलच्या मेगा लिलावात धवनला तीन संघ टार्गेट करू शकतात. अहमदाबाद, लखनऊ आणि पंजाब किंग्स हे तीन संघ शिखरला टार्गेट करण्याची शक्यता आहे.

आयपीएल २०२२ मध्ये अहमदाबाद संघाचा नव्याने समावेश झाला आहे. अहमदाबाद संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटलने ५ हजार १६६ कोटी रुपयांना विकत घेतली आहे. त्यामुळे या संघाला सलामीवीर सारख्या खेळाडूची आवश्यकता असणार आहे. तर दुसरीकडे लखनऊची फ्रँचायझी आरपी-एसजी ग्रुपने ७ हजार ९० कोटी रूपयांना विकत घेतली आहे. हा संघ सुद्धा उत्कृष्ट फलंदाज म्हणून शिखरची निवड करू शकतो. तर तीसरा म्हणजे पंजाब किंग्स आहे. हा संघ २००८ पासून असून त्यांना एकदाही विजेतेपद पटकावतं आलेलं नाहीये. त्यामुळे हा संघ शिखरला कर्णधार म्हणून त्याची निवड करू शकतो.


हेही वाचा: विधान परिषद निवडणुकीची पूर्वतयारी ; देवेंद्र फडणवीस व भाजप नगरसेवकांची बैठक