घरताज्या घडामोडीImmunity Boost: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्की ट्राय करा सुक्यामेव्याच्या वड्या

Immunity Boost: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नक्की ट्राय करा सुक्यामेव्याच्या वड्या

Subscribe

कोरोना काळात सुकामेवा खाणे गरजेचे आहे. कारण सुकामेव्यातील बदाम, अक्रोड, काजू, खजूर, पिस्ते यांच्यात मुबलक प्रमाणात शरीराला आवश्यक असलेले झिंक व व्हिटॅमिन-ई असते. पण बरेचजण रोज सुकामेवा खाण्यास कंटाळा करतात. अशावेळी थोडी कल्पकता वापरून सुक्यामेव्याच्या वड्या किंवा लाडू बनवावे. मुलांबरोबर घरातील मोठ्या व्यक्तीही आवडीने खातात.

सुक्यामेव्याच्या वड्या

साहित्य

- Advertisement -

एक वाटी बदाम, एक वाटी काजू, एक वाटी अक्रोड, एक वाटी पिस्ते, एक वाटी खजूराचा गर, एक वाटी गायीचे तूप, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खसखस

कृती 

- Advertisement -

सर्वप्रथम एका पसरट भांड्यात सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये खजूराचा गर बारीक करून घ्यावा. मग भाजलेला सर्व सुकामेवा मिक्सरमध्ये आपल्या आवडीनुसार बारीक करावा. एका पातेल्यात तूपावर बारीक पावडर केलेला सुकामेवा आणि खजूराचा गर एकजीव परतून घ्यावा. मिश्रण गरम असतानाच ताटात पसरा्वे त्यावर तीळ टाकावे. नंतर त्याच्या वड्या पाडाव्यात किंवा लाडू करावेत.


हेही वाचा – Immunity Boost: रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे सूप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -