घरलाईफस्टाईलचेहऱ्याच्या सौंदर्याकरिता वापरा अ‍ॅपल मास्क...

चेहऱ्याच्या सौंदर्याकरिता वापरा अ‍ॅपल मास्क…

Subscribe

कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी सफरचंदाचे मास्क फायदेशीर ठरतं. जाणून घ्या अ‍ॅपल मास्क तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे...

शारीरिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी दरोरोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा देत असतात. परंतु आता हे सफरचंद फक्त आरोग्यासाठीच फायद्याचे नसून सौंदर्याकरिता देखील फायदेशीर ठरतं. सतत कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या तरुणींना व्यग्र वेळपत्रकातून स्वतः च्या सौंदर्याची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं. अनेकदा चेहरा तजेलदार आणि टवटवीत रहावा यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांची खरेदी केली जाते. चेहऱ्याचा ग्लो परत मिळवण्यासाठी महागड्या पार्लर ट्रिटमेंट घेतल्या जातात. पण त्याऐवजी घरगुती किंवा नैसर्गिक पदार्थांचा वापर करणं नेहमीच फायदेशीर ठरतं. अशाच चेहऱ्याच्या काही समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती संफरचंद मास्कचा वापर करू शकतात.

सफरचंदामध्ये सौंदर्याकरिता अत्यंत आवश्यक असणारे अनेक घटक आहेत. त्वचेसाठी लागणारे व्हिटॅमिन ए, बी, सी आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंट हे घटक असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी सफरचंदाचे मास्क फायदेशीर ठरतं. जाणून घ्या अ‍ॅपल मास्क तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे…

- Advertisement -

असा तयार करा अ‍ॅपल मास्क

अर्धं सफरचंद कापून ते स्मॅश करून घ्या. आता त्यामध्ये क्रिम असलेलं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. तुमचं अ‍ॅपल मास्क चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी तयार आहे. आता तयार मास्क चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका.

अ‍ॅपल मास्क चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

  • चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिम्पल्सची समस्या दूर करण्यासाठी अ‍ॅपल मास्कची मदत होते.
  • डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यासाठी मदत होतेच. तसेच तुम्ही अ‍ॅपल मास्क लावण्याव्यतिरिक्त अ‍ॅपल स्लाइस कापूनही डोळ्यांवर ठेवू शकता.
  • सनबर्न आणि टॅनिंग होत असल्यास त्यापासून सुटका करण्यासाठी मदत करतं.
  • अ‍ॅपल मास्कमध्ये ग्‍लायकोलिक अ‍ॅसिड असतं. जे त्वचेवरील सर्व पोर्स स्वच्छ करण्यासोबतच मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -