घरलाईफस्टाईलवर्ल्ड स्ट्रोक डे: स्ट्रोक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

वर्ल्ड स्ट्रोक डे: स्ट्रोक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

Subscribe

स्ट्रोक म्हणजेच लखवा मारणे किंवा अर्धांगवायूचा झटका.

जगभरात २९ ऑक्टोबरला ‘वर्ल्ड स्ट्रोक डे’ म्हणून साजरा केला जातो. स्ट्रोक येण्याची समस्या ही उतार वयात येते. पण आता बदलत्या जिवनशैलीमुळे कमी वयात स्ट्रोक येण्याची समस्या वाढत आहे. स्ट्रोक होतो म्हणजे काय होत ? त्याची लक्षणे कोणती ? स्ट्रोक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ? या बद्दल जाणून घेऊया.

स्ट्रोक होतो म्हणजे काय होत ?
स्ट्रोक म्हणजेच लखवा मारणे किंवा अर्धांगवायूचा झटका. यात शरीरातील अवयव ही खराब होतात. ज्याला आपण पॅरेलाईज असं म्हणतो. या परिस्थितीत शरीरातील अवयव काम करणं पूर्णपणे बंद करतात. मेंदूच्या विशिष्ट भागांत रक्त पुरवठा न झाल्यास स्ट्रोकची समस्या होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूला गंभीर हानी होते. बऱ्याचदा मेंदू आणि रक्तवाहिनीत गुठळी किंवा गाठी झाल्याने स्ट्रोक होतो. त्याला इश्चेमिक स्ट्रोक म्हणतात. तसेच रक्तवाहिनी फुटल्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होतो त्यानेही स्ट्रोक येतो.त्याला हिमो हेजिक स्ट्रोक म्हणतात.

- Advertisement -

लक्षणे
स्ट्रोकची लक्षणे जाणून घेण्यासाठी F.A.S.T हा शब्द लक्षात ठेवा.
F म्हणजे फेस – चेहऱ्यावरील एखादा भाग झुकल्यासारखा दिसत असेल तर ते स्ट्रोकचं लक्षण आहे.
A म्हणजे आर्मस – यात हात वर केल्यास पटकन खाली पडतो. हाता पायात लुळेपणा येतो.
S म्हणजे स्पिच – व्यक्ती बोलताना अडखळतो किंवा नेहमीपेक्षा वेगळा आवाज येतो.
T म्हणजे टाइम – स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. झटका आल्यानंतर त्वरित औषधोपचार मिळाल्यास रूग्ण बरा होण्यासाठी मोठी मदत होते.
स्ट्रोक येण्याआधी हात, पायात अचानक अशक्तपणा येतो. पायाला मुंग्या येतात. चालताना तोल जातो, बोलताना त्रास होतो किंवा शब्द उच्चारण करताना ही अडथळा निर्माण होतो. शरीराचा काही भाग सुन्न पडतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते, उलट्या होतात, डोके दुखते. बराच वेळा व्यक्तींना मेमरी लॉसचा ही सामना करावा लागतो.

स्ट्रोक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?
आजकाल बदलत्या जिवनशैलीमुळे कमी वयात स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढत आहे. स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे गरचेचे आहे. त्यासाठी धुम्रपान करणे आवर्जून टाळा.आहारात पालेभाज्या, फळे, कमी कोलेस्ट्रोल असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ज्या लोकांना उच्च रक्तदाब,मधुमेह, ह्रदयविकार,लठ्ठपणा यांसारख्या समस्या असतील तर त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्ट्रोक पासून बचावासाठी वेळोवेळी आपली शुगर लेव्हल,वजन नियंत्राणात ठेवले पाहिजे. नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्लेटलेट्स कमी झाल्यास का असते नुकसानदायी; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -