Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Coronavirus: कोरोनाच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी काय कराल?

Coronavirus: कोरोनाच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी काय कराल?

Related Story

- Advertisement -

महामारीच्या या संकटकाळात सगळ्यांनीच वेदनांचा सामना केला आहे. यात स्वतः पॉझिटिव्ह होण्यापासून आपल्या जवळच्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गात आल्याचे सगळ्यांनीच बघितले आहे. यादरम्यान उपचारांसाठी करावा लागलेल्या संघर्षापासून जवळच्या व्यक्तींच्या जाण्यापर्यंत सगळीचं दु:ख सामील आहेत. आर्थिक अडचणींचा सामना प्रत्येक व्यक्ती करत आहे. यामुळे घराघरात नैराश्याचे वातावरण आहे. यामुळेच मनोविकारतज्त्रांच्यामते या नकारात्मकेतून बाहेर पडण्याची सगळ्यांनाच गरज आहे. या दुखातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाला स्वतःलाच रिसेट करावं लागणार आहे.
अमेरिकेच्या पेन्सिलवेनिया विश्वविद्यालयाच्या प्राध्यापिका केरी मिल्कमैन यांनी सगळ्यांनाच आयुष्याची नवीन सुरुवात करण्यास सांगितले आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येकाचे आयुष्य कोऱ्या पाटीप्रमाणे झाले आहे. यामुळे या पाटीवर नव्याने अक्षर गिरवण्याचा सल्ला केरी यांनी दिला आहे. यावर त्यांनी हाऊ टू चेंज सायंस ऑफ गेटींग फ्रॉम वेर यू आर अॅण्ड वेयर यू वॉट टू बी लिहलं आहे. तसेच नवीन सुरुवात या विषयावरील शास्त्रावरही त्या अभ्यास करत आहेत. यासाठी त्यांनी काही सूचना दिल्या आहेत.

नवीन सुरुवातीसाठी दिवस कसा निवडायचा?

- Advertisement -

आठवड्याचा पहिला दिवस, महिन्याचा पहिला दिवस, जन्मदिवस, एखाद्या ऋतुचा पहिला दिवस, किंवा आवडत्या तारखेचा दिवस. असा दिवस निवडल्याने लक्ष्य गाठणे सोपं जातं.

नवीन लक्ष काय असावे?

- Advertisement -

जास्त पैसे कमावणे, करियरमध्ये पुढे जाणे, नवीन नोकरी शोधणे, नवीन काम शिकणे, आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुखकारक कसे बनेल यांच लक्ष्य ठरवणं. कोरोनाच्या आधीच आयुष्य जसं होतं. तसंच कसं जगण्याचा प्रयत्न करणे.

नवीन कामाची योजना बनवा?

नवीन काम करण्याची योजना आखा. सध्या जरी ते सुरू करण्याची संधी मिळत नसेल तरी निराश होऊ नका. शांत रहा. संधीची वाट पाहा.

नवीन मित्र बनवा

नवीन मित्र आपल्या जीवनात नवीन उद्देश्य घेऊन येऊ शकतात. त्यांच्यामार्फत नवीन संधीही मिळू शकते. पण याचा अर्थ जुने मित्र सोडणे असा नाही. तर नवीन मित्र वाढवणे असा आहे. मित्रांंबरोबर गप्पा सल्ला मसलत करून मन मोकळं होतं. मार्ग सापडतात.

कपाट साफ करा

एका संशोधनानुसार एक व्यक्ती ६८ कपडे खरेदी करते. यामुळे कपाटात कपडे साठवून न ठेवता जुने कपडे गरजू व्यक्तींना द्यावे. यामुळे रोज कोणता ड्रेस घालायचा असा प्रश्नही पडणार नाही. तसेच गरजेनुसार कपडे खरेदी करने. बचतीकडे लक्ष द्यावे.

घरातलं अडगळीचे सामान हटवावे

आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्यांचा आपण वापर करत नाही. अशा वस्तू हटवून टाकाव्यात. यामुळे घरातील अडगळं कमी होईल.

स्वतःचा विचार करण्यासाठी वेळ काढा

झालं गेलं विसरून जा. पुढे काय करायचंय त्याचा विचार करा. याकाळात आलेले अनुभव, विचार लिहून काढा. तसेच काय शिकायला हवं तसेच कोणती परिस्थिती बदलायला हवी यावर लिहून काढा. त्यावर आधारित टीप्स काढा. नवीन बजेट बनवा.

सकारात्मक राहा

ज्या घटनांमुळे मनस्ताप आणि दुःख होत आहे त्या घटनांंचा विचार करणं बंद करा. नव्याने स्वतःला तयार करा. ज्या व्यक्तींसारखे बनण्याचे तुमचे स्वप्न होते. ते आठवा. त्यानुसार स्वतमध्ये बदल करा. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा.

- Advertisement -