घरताज्या घडामोडीLok Sabha : सांगली, ईशान्य मुंबई जागेवरून मविआत धुसफूस; ठाकरेंना फेरविचार करण्याची...

Lok Sabha : सांगली, ईशान्य मुंबई जागेवरून मविआत धुसफूस; ठाकरेंना फेरविचार करण्याची विनंती

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून शिवसेनेने पुन्हा फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. (lok sabha 2024 congress balasaheb thorat and vijay wadettiwar on sangli lok sabha)

महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा कायम असताना ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात तसेच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेची घोषणा केली त्याबद्दल आमच्या सर्वांची नाराजी आहे. युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे होता आता पुन्हा फेरविचार केला पाहिजे. भिवंडी, सांगली या पारंपरिक आमच्या जागा आहेत. मुंबईत एक जागा दिलेली आहे. आणखी एक जागा द्यावा आमची अपेक्षा आहे. मात्र तसं न करता आघाडी धर्म पाळला नाही त्यांनी काळजी घेणे आवश्यक होतं. ती त्यांनी घेतली नाही. या जागांवरती आम्ही आणि आमचे कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत. दिल्लीतील आमचे नेतेही यावरती आग्रही आहेत. सांगलीची जागा ही वसंतदादा पाटील यांच्यापासून राहिलेली आहे.या जागा सोडणे आम्हाला खूप वेदनादायी आहेत त्यामुळे याचा फेरविचार झाला पाहिजे. सांगली, भिवंडी आणि मध्य मुंबई यासाठी अजूनही आम्ही आग्रही आहे आणि प्रयत्न करत आहोत त्यांनी फेरविचार करावा”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

“सध्याच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत पाहिजेत अजूनही वेळ गेलेली नाही याचा विचार केला पाहिजे. त्यांना काय पाहिजे या संदर्भातही त्यांनी चर्चा केली पाहिजे आघाडीची भूमिका आहे. त्यांनी आमच्या सोबत राहील पाहिजे. या परिस्थितीमध्ये जनतेचा विश्वास आमच्या सोबत आहे. त्यामुळे जागा वाढवून मिळावा हे कोणाचीही भूमिका असेल. प्रकाश आंबेडकरांनी 16 जागांचा प्रस्ताव पाठवलेला होता आम्हीही पाच जागांचा प्रस्ताव दिला होता. मराठा समाजामध्ये नाराजी आहे ती सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे त्यामुळे ती सरकारच्या विरोधामध्ये काम करेल. प्रकाश आंबेडकरांनी अजूनही चर्चा केली पाहिजे आणि भूमिका बदलली पाहिजे. सर्वच पक्षांमध्ये अडचणी सुरू आहेत त्यामुळे आमच्या पक्षातील अडचणीही आम्ही सोडू त्यात काही विषय नाही”, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय, “महाविकास आघाडीचा जागावाटप चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे हे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.


हेही वाचा – Lok Sabha : शाहू महाराजांमुळे वाद न घालता कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -