नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच, उमेदवारी याद्या जाहीर करण्याची लगबग सुरू झाली. त्यापाठोपाठच आता भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा चांगलीच तयारीला लागली आहे. त्यादृष्टीने प्रयत्नशील असलेल्या भाजपाने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसाठी देखील भाजपने आपले स्टार प्रचारक जाहीर केले आहेत.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : वंचितच्या या जागांवर मविआ निवडणूक लढवणार?
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर
भाजपाने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेले आणि विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, रिपाईं अध्यक्ष रामदास आठवले, अन्नामलाई यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर या लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मध्य प्रदेश तर विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, स्मृती ईराणी, मिथुन चक्रवर्ती आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.
Lok Sabha Elections 2024 | BJP releases star campaigners including PM Modi, Amit Shah, JP Nadda, and Yogi Adityanath for Bihar. pic.twitter.com/1aepSTBzYr
— ANI (@ANI) March 26, 2024
हेही वाचा – Mahayuti : रिपाइंला झालेली जखम कशी भरून काढणार? रामदास आठवलेंचा फडणवीसांना सवाल