घरताज्या घडामोडीलग्नामुळे पुरुषांचा फायदा तर महिलांचा तोटा

लग्नामुळे पुरुषांचा फायदा तर महिलांचा तोटा

Subscribe

लग्न ही पुरुष प्रधान संज्ञा असून त्यात त्यांना फायदाही आहे. पण यात महिलांचे मात्र नुकसान आहे. असे सांगत नादियाने तिच्या महिला चाहत्यांना लग्न न करण्याचा सल्ला हिला आहे.

लग्नाच्या गाठी या स्वर्गात जुळतात असे म्हटले जाते. पण ऑस्ट्रेलियातील रिलेशनशिप एक्सपर्ट व लेखिका असलेली नादिया बोकोडी यांनी मात्र लग्नामुळे पुरुष फायद्यात असतो पण महिलांच्या वयावर मात्र त्याचा वाईट परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. नादियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लग्नामुळे महिलांवर कामांचा बोझा पडतो असे म्हटले आहे. नादियाच्या या पोस्टवर अनेकांनी आक्षेप घेतला असून नेटवर सध्या नादिया ट्रेंडमध्ये आहे. नादियाने पोस्टमध्ये लग्नानंतर पुरुषांच्या पत्नीकडून वाढणाऱ्या अपेक्षांबद्दल लिहलं आहे. पत्नीने घराबरोबर मुल व करियरही सांभाळावे अशी पुरुषांची अपेक्षा असते. यामुळे लग्न ही पुरुष प्रधान संज्ञा असून त्यात त्यांना फायदाही आहे. पण यात महिलांचे मात्र नुकसान आहे. असे सांगत नादियाने तिच्या महिला चाहत्यांना लग्न न करण्याचा सल्ला हिला आहे.

नादियाच्या मते विवाहीत पुरुष बऱ्यापैकी पैसा तर कमावतातच पण घरात बिनपगारी काम करणाऱ्या महिलेमुळेच बरेच वर्ष जगतात. तसेच ज्या महिला लग्नाच्या बेडीत स्वतला अडकवत नाहीत त्या खऱ्या अर्थाने आयुष्य जगतात. पैसे कमावतात. बरेच वर्ष आनंदी आयुष्य जगतात. आपला हा मुद्दा पटवून देण्यासाठी नादियाने कैलिफोर्निया विद्यापीठाच्या
एका संशोधनाचा हवालाही दिला आहे. त्या संशोधनानुसार पुरुषाबरोबर राहणाऱ्या महिलांना दुप्पट काम करावी लागतात. मुलांच्या संगोपणातही त्या १०० टक्के देतात. यामुळे सुखी आयुष्य जगायचं असेल तर लग्नाच्या फंदयात पडू नका असं थेट नादियाने महिलांना सांगितलं आहे. नादियाच्या या पोस्टवर १.६०० हून अधिक लाईक्स असून महिलांनी तिचे सर्मथन केले आहे. तर काहीजणांनी आयुष्यसोबती किती गरजेचा असतो हे देखील सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -