Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल पर्यावरण वाचवाल तर नक्की वाचाल!

पर्यावरण वाचवाल तर नक्की वाचाल!

Related Story

- Advertisement -

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. सध्या पर्यावरण वाचवण्यासाठी रोजच्या आयुष्यात काही छोटे छोटे प्रयत्न केल्यास, आपल्याकडून पर्यावरणासाठी नक्कीच काहीतरी करता येईल. पक्षी, प्राणी, झाडं, शेती, पाऊस, नद्या, स्वच्छ हवा अशा नैसर्गिक गोष्टींबद्दल जोपर्यंत माणसात आपुलकी निर्माण होत नाही आणि जोवर आपण पर्यावरणावर प्रेम करायला शिकत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवेत.

kitchen garden
स्वयंपाकघरातील बाग

- Advertisement -

स्वयंपाकघराजवळ तुमची स्वतःची बाग तयार करा – या बागेमध्ये सेंद्रीय फळे आणि भाज्या या घरामध्ये वापरता येऊ शकतात. आपल्या बाल्कनीमध्येच ही शेती करू शकता. ज्यामुळे तुम्ही घरातील कचरा खत म्हणून वापरू शकता. तर बाग चांगली दिसण्यासाठी घरातील नको असलेल्या गोष्टी फेकण्याऐवजी त्याचा प्लॉट म्हणूनदेखील उपयोग करू शकता. जेणेकरून तुमची बाग रंगीत आणि देखणी दिसेल. कोरफड, तुळस अशी झाडं लावल्यामुळे घरात चांगला ऑक्सीजन येत राहतो. तर टॉमेटो, पालक, मिरच्या, भोपळी मिरच्या यासारख्या भाज्या तुम्ही घरच्या घरी ताज्या उगवू शकता.

बाग जपत असताना पाणीही वाचवा – छोटी आणि मोठी रोपं एका क्रमानं लावावीत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी वाचवण्यास मदत होते. एकत्र स्वरुपात त्यांची मांडणी केल्यास, मोठी झाडं ही लहान झाडांचं संरक्षण करतात. त्यामुळे रोज पाणी वाचवण्यास मदत होते. तसेच कोरडे गवत वापरल्यास, पाणी जास्त वेळ राहण्यास मदत होते आणि त्यामुळे जमीनही चांगली राहते.

- Advertisement -

waste
झाडात कचऱ्याचं विघटन

आपल्या घरातील कचऱ्याचं विघटन करा – स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करा. ज्याचा आपल्या बागेतील झाडांसाठी उपयोग करता येऊ शकतो आणि त्या कचऱ्यापासून पर्यावरणालादेखील हानी पोहचणार नाही. बागेतील खराब झालेल्या पानांचादेखील वाळवून खत म्हणून उपयोग करता येतो.

प्लास्टिकचा वापर टाळावा – शक्य तितका प्लास्टिकचा वापर करणं टाळावं. प्लास्टिकची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. त्यामुळे रिसायकल करता येणारं प्लास्टिक वापरलं पाहिजे.

plantation-trees
झाडे जगवा

रस्त्यात कचरा फेकणे टाळा – आजसुद्धा रस्त्यात कचरा फेकणारी लोक आपल्याला सर्रास दिसतात. जर त्यांना जाणीव नसेल तर ती आपण आपल्या कृतीमधून करून द्यावी. रस्त्यावर कचरा दिसल्यास आपण उचलावा तर कदाचित बघणाऱ्याला लाज वाटून तो अशी कृती करणे टाळेल.

- Advertisement -