घरCORONA UPDATECorona Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख पार!

Corona Update: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख पार!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ७ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२९ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या ७ लाख ३ हजार ८२३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तसेच गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ३०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७३.१४ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज झालेल्या मृतांमध्ये मुंबई ३५, ठाणे १२, नवी मुंबई ८, उल्हासनगर ५, रायगड ३५, नाशिक ८, अहमदनगर ३, जळगाव १२, पुणे ४९, पिंपरी चिंचवड मनपा ९, सातारा ८, कोल्हापूर ३७, सांगली १५, औरंगाबाद २१, नागपूर २४ जणांचा यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ३२९ मृत्यूंपैकी २४१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४४ मृत्यू  हे औरंगाबाद १०, ठाणे १०, अहमदनगर ८, कोल्हापूर ६, नाशिक ३, पुणे ३, नागपूर २, लातूर १ आणि सातारा १ असे आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राने या देशांना कोरोनाबाधितांच्या संख्येत मागे टाकले

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिका अव्वल स्थानावर असून यानंतर ब्राझील आणि भारताचा नंबर आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने साउथ आफ्रिका, पेरू, मेक्सिको यांसारख्या देशांना मागे टाकले आहे. तर राज्यातील मृतांच्या संख्येत साउथ आफ्रिका, कोलंबिया, चिल्ली, इराण यांसारख्या देशांना मागे टाकले आहे.


हेही वाचा – देशात ‘या’ नागरिकांमुळे कोरोनाचा होतोय फैलाव – ICMR


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -