Corona Update: राज्यातील कोरोना बळींची संख्या १७ हजार पार!

Maharashtra Corona Update 9000 news corona positive patient and 180 deaths in 24 hours
महाराष्ट्रातील आजची कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून बाधितांची संख्या ५ लाखांच्या उंबरठ्यावर आहे. तसेच राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने १७ लाखांच्या टप्पा देखील पार केला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत १० हजार ४८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा संख्या ४ लाख ९० हजार २६२वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १७ हजार ९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २४ तासांत राज्यात १० हजार ९०६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६.७६ टक्के एवढे झाले असून मृत्यूदर ३.४९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २५ लाख ६९ हजार ६४५ प्रयोग शाळा नमुन्यांपैकी ४ लाख ९० हजार २६२(१९.०७टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ८२ हजार ७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५ हजार २६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे….

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका ८६२ १२१०१२ ४५ ६६९३
ठाणे १७५ १४८५६ ३७५
ठाणेमनपा १८८ २२२११ १० ७९२
नवीमुंबईमनपा ३८५ १९४५९ ४८५
कल्याणडोंबवलीमनपा २५२ २४५६३ ५००
उल्हासनगरमनपा २० ७२९६ १७९
भिवंडीनिजामपूरमनपा ३९५८ २८०
मीराभाईंदरमनपा ७३ ९६३४ ३०२
पालघर ६७ ४३१८ ५७
१० वसईविरारमनपा १३५ १३२६२ १४ ३४३
११ रायगड २५६ ११०६० २८३
१२ पनवेलमनपा १७५ ८२४६ १९ २०३
१३ नाशिक २११ ४७०४ १३१
१४ नाशिकमनपा ५२७ १२५६० २३ ३२५
१५ मालेगावमनपा ४३ १५७१ ९१
१६ अहमदनगर २८१ ४३०३ ६७
१७ अहमदनगरमनपा १८५ ३६०३ २४
१८ धुळे १७६६ ६३
१९ धुळेमनपा ११६ १८२८ ५५
२० जळगाव ४१७ १००५८ ४७१
२१ जळगावमनपा ३३९४ ११०
२२ नंदूरबार १३ ७४० ४३
२३ पुणे ५५१ १२५८८ १७ ३७९
२४ पुणेमनपा १३९५ ६८०४३ ३५ १७०५
२५ पिंपरीचिंचवडमनपा ९०५ २६५७३ १८ ४८२
२६ सोलापूर २५२ ५४३५ १७१
२७ सोलापूरमनपा ५१ ५४३३ ३९२
२८ सातारा २२० ५२३४ १६३
२९ कोल्हापूर १७८ ६२६८ १४३
३० कोल्हापूरमनपा ९२ १६५३ ५३
३१ सांगली ७१ १६१० ५३
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा १२१ २५१६ ५६
३३ सिंधुदुर्ग १५ ४४८
३४ रत्नागिरी १३ २००८ ७२
३५ औरंगाबाद २५१ ४५७५ ७४
३६ औरंगाबादमनपा १९६ ११०९० ४६०
३७ जालना ६१ २१४८ ७९
३८ हिंगोली ६० ७४९ १५
३९ परभणी २८ ५०० १७
४० परभणीमनपा ३४ ३७९ १५
४१ लातूर १३० १९५३ ७६
४२ लातूरमनपा ४२ ११८१ ५७
४३ उस्मानाबाद १६३ १८९२ ६०
४४ बीड १४२ १३२९ २७
४५ नांदेड १२८ १५५९ ४८
४६ नांदेडमनपा ७० १२५७ ५४
४७ अकोला ४४ १०४६ ४६
४८ अकोलामनपा २७ १८४० ८२
४९ अमरावती ३२ ५६३ २५
५० अमरावतीमनपा ५१ २०७७ ५७
५१ यवतमाळ ३४ १२८६ ३२
५२ बुलढाणा ४४ १७०७ ४९
५३ वाशिम ५९ ८३९ १८
५४ नागपूर १७१ २४३५ ३६
५५ नागपूरमनपा ३४६ ५०३२ ११ १४८
५६ वर्धा २५५
५७ भंडारा १३ ३३१
५८ गोंदिया ४७५
५९ चंद्रपूर ३७ ५२५
६० चंद्रपूरमनपा १६३
६१ गडचिरोली २१ ३८१
इतरराज्ये /देश १३ ४८४ ५४
एकूण १०४८३ ४९०२६२ ३०० १७०९२