घरताज्या घडामोडीचाकरमानी म्हणतात, 'एसटी'च बेस्ट! शुक्रवारी ४२ बसेस कोकणात रवाना!

चाकरमानी म्हणतात, ‘एसटी’च बेस्ट! शुक्रवारी ४२ बसेस कोकणात रवाना!

Subscribe

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनसाठी शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बस स्थानकातून ४२ बसेस रवाना झाल्या आहेत. तर ४ हजार ५०० लोकांनी गणपती उत्सवाला कोकणात जाण्यासाठी आरक्षण केली आहे. तसेच आतापर्यंत २२ बसेस गट आरक्षणासाठी(ग्रुप बुकिंग) नोंदवल्या गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई विभागातून १५० बसेस १२ ऑगस्टपर्यंत आरक्षणासाठी ठेवल्या आहेत. त्यापैकी १०० बसेसचे आरक्षण शुक्रवार संध्याकाळपर्यत फुल्ल झाले आहे.

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनसाठी एसटीने ६ ते १२ ऑगस्ट अखेर ४०० बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून सुटणार्‍या बसेस कोकणातील जिल्हा व तालुक्याच्या मुख्यालयापर्यंत थेट धावणार आहेत. तेथून पुढे स्थानिक आगाराच्या एसटी बसेस प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी उपल्बध असतील. गणेशोत्सवासाठी एसटीची वाहतूक सुरु होताच दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी ४४ गाडया मुंबई, ठाणे, पालघरमधून रवाना झाल्या. तर तब्बल ४ हजार ५०० प्रवाशांनी आरक्षण केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. तसेच एसटीच्या ग्रुप बुकींग योजनेला चाकरमान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारपर्यत ग्रुप बुकींगच्या २२ गाड्या आरक्षित झाल्या. तर मुंबई विभागातून १५ गाड्या ग्रुप बुकींगच्या जाणार आहेत.

- Advertisement -

१०० बसेसचे आरक्षण फुल्ल

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपेक्षा शुक्रवारी कोकणात जाणार्‍या बसची संख्या दुप्पट झाली. शुक्रवारी ४४ बस कोकणात गेल्या तर २२ बसेसचे ग्रुप बुकींग झाले आहे. मुंबई विभागातून १५० बसेस १२ ऑगस्टपर्यंत आरक्षणासाठी आहेत. त्यापैकी सुमारे १०० बसेसचे आरक्षण शुक्रवार संध्याकाळ पर्यत फुल्ल झाले होते.

असे आहे तिकीट दर

ठिकाण   तिकिट दर

- Advertisement -

राजापुर    ५८० रु

मालवण    ७३० रु

देवगड      ७१०रु

गुहागर     ४७०

खेड        ३५०रु

दापोली     ३९५रु

रत्नागिरी   ५३५रु

चिपळुण    ४००रु


हे ही वाचा – Sushant Sucide Case: रियाची मॅनेजर श्रृती मोदीची ED कडून ८ तास चौकशी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -