घरमहाराष्ट्रत्या १०८ हल्लेखोरांना अटक; चाकण मराठा आरक्षण हिंसाचार

त्या १०८ हल्लेखोरांना अटक; चाकण मराठा आरक्षण हिंसाचार

Subscribe

तब्बल १ हजार जणांची फोटो आणि व्हिडिओद्वारे चौकशी करण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

गेल्या वर्षी चाकण येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन हिंसाचार झाला होता. तेव्हा काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना बेदम मारहाण केली होती. या घटने प्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव चौकशीत समोर आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. व्हिडिओ आणि फोटोद्वारे तब्बल २ हजार जणांची चौकशी करण्यात आली पैकी १०८ जणांना अटक करण्यात आली आहे.

निर्दोष व्यक्तींना त्रास होणार नाही

आंदोलन आणि पोलीस ठाण्यावरील हल्ला या दोन्ही वेगळ्या घटना आहेत. यात निर्दोष व्यक्तींना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गेल्या वर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चाकण येथे मोर्चा घेण्यात आला होता. त्याला अचानक हिंसक वळण लागले होते. काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला होता. त्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. तर शेकडो वाहनांची जाळपोळ, दगडफेक करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव म्हणतात, ‘आमचं ठरलंय’, पण चंद्रकांतदादा म्हणतात, ‘कुठं ठरलंय’?

पारदर्शक कारवाई करा – अजित पवार

दरम्यान, चाकण पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या १०८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर १५ जण संशयित असून २३ जणांची चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ही कारवाई पारदर्शक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केली असून कोणाला लक्ष्य न करता, पारदर्शक कारवाई व्हावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -