घरमहाराष्ट्रST कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1080 कोटींची गरज, पण सरकारने दिले फक्त 300 कोटी

ST कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1080 कोटींची गरज, पण सरकारने दिले फक्त 300 कोटी

Subscribe

एसटी महामंडळाने सरकारकडे 738 कोटी रुपयांची मागणी केली होती. तर त्यापैकी फक्त 300 कोटी रुपयेच का दिले? असा प्रश्न बरगे यांनी सरकार समोर उपस्थित केला.

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला (ST mahamandal ) 300 कोटी रुपयांची मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रति महिना पगारासाठी 360 कोटी रुपयांच्या निधीची गरज असते. पण सरकारने 300 कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. त्यामुळेच या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (shrirang barge) यांनी राज्य सरकारला इशारा देत म्हणाले, ‘जेवढी मागणी केली आहे तेवढा निधी सरकारने द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष करावा लागले’.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्रति महिना 360 कोटी रुपये लागतात. पण या सरकाने मात्र मागील तीन महिन्यांमधे फक्त 600 कोटी रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाला दिली. अशी माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. त्यामुळे या महिन्याचा एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले नाही. त्याचा कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप झाला. त्यांचीही गैरसोय झाली. यासंदर्भांत कोर्टात त्रिसदस्यीय समितीने अहवालसुद्धा सादर केला आहे. त्यानुसार चार वर्ष वेतनासाठीची तरतूदही केली आहे. मात्र, चार वर्ष होण्या आधीच वेतनासंदर्भात अनियमितता सुरु आहे. असंही बरगे म्हणाले.

- Advertisement -

सरकार विरोधात संघर्ष करण्याचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तीन महिन्याचे 360 कोटींप्रमाणे 1080 कोटी रुपये सरकारने देणे अपेक्षित आहे. मात्र ते अद्याप दिलेले नाहीत. या संदर्भांत एसटी महामंडळाने सरकारकडे 738 कोटी रुपयांची मागणी केली होती. तर त्यापैकी फक्त 300 कोटी रुपयेच का दिले? असा प्रश्न बरगे यांनी सरकार समोर उपस्थित केला. बरगे पुढे म्हणले, सत्तेत नसताना हे लोक म्हणायचे की एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना वेळेवर पगारसुद्धा मिळाला पाहिजे. पण हेच लोक आता सत्तेवर आल्यावर त्यांनी दिलेली आश्वासने विसरले. असंही असल्याचे बरगे म्हणाले. त्यामुळेच नवीन सरकारने दिवाळी तोंडावर आली आहे, सणासुदीच्या दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची कुचंबना होऊ नये यासाठी त्वरित आम्ही केवढा निधी देण्याची मागणी केली होती, तेवढा निधी द्यावा. नाहीतर आम्हाला या सरकार विरोधात संघर्ष उभा करावा लागले. असा इशारा सुद्धा बरगे यांनी दिला.

- Advertisement -

हे ही वाचा – अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -