घरमहाराष्ट्रधक्कादायक! १३ दिवसांची भाची सतत रडते, म्हणून मामाने केली चिमुरडीची हत्या

धक्कादायक! १३ दिवसांची भाची सतत रडते, म्हणून मामाने केली चिमुरडीची हत्या

Subscribe

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक या गावी माहेरी असलेली महिला येथे बाळंतपणासाठी आली होती.

लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जो ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल. अवघ्या १३ दिवसांच्या चिमुकल्या भाचीची मामानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लातूरमधील झरी बुद्रूक येथील ही घटना असून भाची सतत रडते त्यामुळे झोपमोड होत असल्याच्या या क्षुल्लक करणावरुन या चिमुकलीची ड्रममध्ये बुडवून त्याने हत्या केली.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक या गावी माहेरी असलेली महिला येथे बाळंतपणासाठी आली होती. तेरा दिवसांपूर्वी या महिलेने एका मुलीली जन्म दिला. काही दिवसानंतर ती आपल्या सासरी परत जाणार होती, मात्र या दरम्यान शनिवारी सकाळपासून घरात ही चिमुरडी दिसेनाशी झाली. चिमुकली दिसत नाही म्हणून शोधाशोध सुरु करण्यात आली. बराच वेळ शोधा-शोध केल्यानंतर मुलगी घराच्या बाजूला असणाऱ्या पाण्याच्या ड्रममध्ये मृत अवस्थेत सापडली.

- Advertisement -

या प्रकारामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून या घटनेनंतर याची माहिती तात्काळ चाकूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेचा माग काढला असता चिमुरडीचा २० वर्षीय मामा कृष्णा अंकुश शिंदे यानेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. तिच्या सततच्या रडण्याने त्याची रात्री झोपमोड होत होती. या शुल्लक कारणामुळे त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे. चाकूर पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

रविवारी कृष्णा शिंदे याच्या विरुद्ध ३३०/२० कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कृष्णा याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहेत.


पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; रस्त्यावरुन चालणाऱ्या सहा जणांना टँकरने उडवले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -