घरCORONA UPDATEजितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकांसह १४ जणांना कोरोनाची बाधा!

जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकांसह १४ जणांना कोरोनाची बाधा!

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत असणारे त्यांचे २ अंगरक्षक आणि संबंधित कर्मचारीवर्ग अशा एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आव्हाड, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा अशा तिघांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या १४ जणांमध्ये त्यांचे अंगरक्षक, घरातले आचारी, इतर कर्मचारी, एका चॅनलचे रिपोर्टर आणि कॅमेरामन यांचा समावेश आहे. चाचणीचे अहवाल आल्यानंतर कोरोनाची बाधा झालेली नसताना देखील आव्हाड यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून स्वतःला १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे. ठाणे महानगपालिकेच्या हद्दीत सोमवारी २४ नवीन कोरोना संशयित आढळून आलेले असून त्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकाराचा देखील समावेश आहे. यासह ठाण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ७६ झाला आहे.

‘सुदैवाने माझ्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही नियमानुसार मला आता किमान पुढील १४ दिवस होम क्वॉरंटाईन व्हावे लागणार आहे’, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण केईएममध्ये दाखल

ठाणे आयुक्तलयाच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. हे अधिकारी मर्कज वरून आलेल्या तबलिगी जमातीच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक असलेल्या पाच पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना ताबडतोब मुंबईतील केईएम आणि बोरिवली येथील रुग्णालायत उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आव्हाड यांच्या अंगरक्षकांचा वावर थेट आव्हाड यांच्या बंगल्यात असल्यामुळे तेथील कर्मचारी आणि स्वत: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचे देखील नमुने घेण्यात आले होते. सुदैवाने आव्हाड, त्यांच्या पत्नी आणि मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला असून उरलेल्या एकूण १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आव्हाड यांची येत्या ७ दिवसांत पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल देखील निगेटिव्ह येईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त करून, लवकरात लवकर तुमच्यामध्ये “मी पुन्हा येईन..!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

सहाय्यक पोलीस निरीक्षकालाच कोरोनाची लागण

दरम्यान, ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला कोरोनाची बाधा झाल्याचं देखील स्पष्ट झालं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे नमुने देखील घेण्यात आलेले असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. भिवंडीतील पोलीस ठाण्यात देखील एक पोलीस कर्मचारी कोरोनाचा संशयित रुग्ण मिळून आलेला आहे. तसेच ठाण्यात एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -