घरCORONA UPDATECoronaVirus - पालिकेची कोरोनाबाधित रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा!

CoronaVirus – पालिकेची कोरोनाबाधित रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा!

Subscribe

सेव्हनहिल्ससह अंधेरीतील मिल्लत नगरमध्ये केंद्र सुरु

डायलिसिसची गरज असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना या प्रकारची सेवा घेता यावी यासाठी महापालिकेच्यावतीने सेव्हन हिल्ससह अंधेरी पश्चिम येथील मिल्लत डायलिसिसची केंद्रात सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी मिल्लत डायलेसीस केंद्र महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

‘कोरोना कोविड १९’ या आजाराचा संसर्ग ‘लिसिस’ यंत्राच्या माध्यमातून इतर व्यक्तींना होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेत डायलिसिसची गरज असणाऱ्या ‘कोरोना कोविड १९’ बाधित रुग्णांसाठी डायलिसिसची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. याच अनुषंगाने आता के पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या क्षेत्रात असणारे ‘मिल्लत डायलिसिस केंद’ महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज ‘के पश्चिम’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांना दिले आहेत. त्याचबरोबर याच अनुषंगाने महापालिकेच्या अखत्यारीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात देखील २० डायलिसिस यंत्रे बसविण्याचेही आदेशही सोमवारी त्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

‘कोरोना कोविड १९ बाबत संसर्ग पसरू नये, यासाठी मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व डायलिसिस सेंटर साठी काही नवीन नियम गेल्याच आठवड्यात लागू करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने नियमित डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांचे डायलिसिस करण्यापूर्वी त्यांची ‘कोरोना कोविड १९’ विषयक प्राथमिक तपासणी अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे आणि या पडताळणी दरम्यान काही लक्षणे आढळून आल्यास, त्यांना कोरोना बाधितांसाठी स्वतंत्र डायलिसिस व्यवस्था असणाऱ्या रुग्णालयात तसेच केंद्रामध्ये उपचारार्थ तात्काळ पाठवण्याच्या या आदेशांचा समावेश आहे.


हे ही वाचा – लॉकडाऊनमध्ये रिेतेश- जेनेलियाच्या प्रेमाला ऊत, व्हीडिओ केला शेअर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -