घरताज्या घडामोडीनाणार प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची १४०० एकर जमीन; निलेश राणेंचा आरोप

नाणार प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची १४०० एकर जमीन; निलेश राणेंचा आरोप

Subscribe

माजी खासदार निलेश राणे यांचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाधित भागात १४०० एकर जमीन विकत घेतली. इतकेच नव्हेतर नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. नाणार प्रकल्पाच्या बाधित जमिनीत, राजापूर येथे येऊ घातलेल्या एमआयडीसीच्या जागेवर जमिनीचा गैरव्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक नाणारच्या जमीन व्यवहारात आहे. नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलने केली, लोकांना भडकवले. हे सर्व करत असताना मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक प्रकल्पाच्या बाधित जमिनीचा व्यवहार करत होते. नाणारमध्ये सुगी डेव्हलोपर्स नावाची कंपनी आहे.

दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा आरोप खोडून काढला आहे. ते म्हणाले की, “निलेश राणेच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाहीत. कारण ते एकतर अभ्यास करुन बोलत नाहीत आणि बऱ्याच वेळा शुद्धितही बोलत नाहीत. आता त्यांनी एक जावई शोध लावला आहे की, नाणार रिफायनरी परिसरात देशमुख नावाच्या गृहस्थांनी १४०० एकर जमिन घेतली असून हे गृहस्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक आहेत. हा आरोप पोरकट पणाचा आहे.”

- Advertisement -

दरम्यान राणे यांनी सांगितले की, सुगी डेव्हलोपर्स या कंपनीचे एक संचालक निशांत सुभाष देशमुख हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. त्यांचे जवळपास १४०० एकर जमिनीचे व्यवहार झालेले आहेत. दीपक वायंगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून त्यांनी राहण्यासाठी आणि ऑफिससाठी जमीन घेतली आहे. त्यांचा स्टाफ इथे कार्यरत होता; पण लॉकडाऊनदरम्यान ऑफिस बंद पडल्याने स्टाफ निघून गेला. आता त्या ऑफिसमध्ये तुम्हाला कुणीही सापडणार नाही, असे निलेश म्हणाले.

- Advertisement -

अ‍ॅड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. त्यांना सुगी कंपनीने नेमले होते. अ‍ॅड. कावतकर यांनी नाणारमधील जमिनीचे करार बनवले आहेत. सुगी कंपनीचे संचालक आणि उद्धव ठाकरेंचे मावस भाऊ निशांत देशमुख यांनी नाणार प्रकल्पाच्या बाधित जमिनीत १४०० एकर जागा विकत घेतली. मात्र, यापैकी एकही एकर जमीन त्यांनी स्वत:च्या नावावर केलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

मी आरओसीमधून याबाबत माहिती काढली आहे. सगळे व्यवहार एलएलपीमधून झाले आहेत. एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिप. सर्व व्यवहार २०१४ ते २०१९ या काळात झालेले आहेत. जमिनीचे भाव चढले तेव्हा व्यवहार थांबवले, असेही ते म्हणाले. ऋतुजा डेव्हलोपर्स ही पुण्याची कंपनी आहे. या कंपनीने नाणारमध्ये ९०० एकर जमिनीत गुंतवणूक केलेली आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांनी फक्त मध्यस्थीची कामे केली आहेत. त्यांनी सर्व व्यवहार परप्रांतीयांना करून दिलेले आहेत. यामध्ये ८० टक्के यात परप्रांतीय आहेत.

नाणार रिफायनरी प्रकल्पाचा अध्यादेश काढून रद्द झाला आहे, असे शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येते. नाणारचा विषय आमच्यासाठी संपलाय, असे शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार बोलत असतात. पण रिफायनरीची एक कमिटी हा प्रकल्प आणू पाहतेय. ही कमिटी सातत्याने मुख्यमंत्री ठाकरेंच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करत असल्याची माहीती आहे. हा प्रकल्प रद्द झाला आहे तर मग चर्चा नेमकी कशासाठी होत आहे?, असा सवालही निलेश राणे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -