घरमहाराष्ट्रमोठी बातमी! मुंबईत गोवरचा १४ वा बळी, गोवरमुळे एक वर्षीय मुलीचा मृत्यू

मोठी बातमी! मुंबईत गोवरचा १४ वा बळी, गोवरमुळे एक वर्षीय मुलीचा मृत्यू

Subscribe

अंधेरी येथील ज्या १ वर्षीय मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाला, त्याचे लसीकरण झालेले नसल्याचे समोर आले आहे. त्याला जन्मजात हृदयविकार होता

मुंबई -: मुंबईत गोवंडी, वडाळा आणि अन्य काही भागात गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. अंधेरी येथे राहणाऱ्या एक वर्षीय मुलीचा सोमवारी गोवरमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. तिचे लसीकरण झाले नव्हते. मुंबईत गेल्या अडीच महिन्यात गोवरमुळे १४ वा बळी गेला आहे. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेला गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखीन कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

अंधेरी येथील ज्या १ वर्षीय मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाला, त्याचे लसीकरण झालेले नसल्याचे समोर आले आहे. त्याला जन्मजात हृदयविकार होता. त्याला उपचारासाठी महिनाभर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला २६ नोव्हेंबर रोजी ताप आणि पुरळ येऊन श्वसनास त्रास झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने उपचार करण्यासाठी पालिका रुग्णालयात दाखल करण्यात होते. मात्र उपचार सुरू असताना तिची प्रकृती गंभीर झाली आणि २८ नोव्हेंबर रोजी तिचा दुपारी १.३० मिनिटांनी मृत्यू झाला. कालपर्यंत गोवरमुळे १३ रुग्णांचा बळी गेला होता. आता या मुलीच्या मृत्यूमुळे गोवरने १४ वा बळी घेतला आहे.

- Advertisement -

मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने प्रसार होत असून, शहरात भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, तर पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, पूर्व उपनगरातील गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप या भागात गोवरचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे या विभागातून गोवरचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. गोवरच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत १४ रुग्णांचा बळी गेला असून, त्यापैकी ११ रुग्ण हे मुंबईतील तर ३ रुग्ण हे मुंबईबाहेरील होते. मुंबईत गोवरबाधित रुग्णांची संख्या ३०३ वर पोहोचली असून, संशयित रुग्णांची संख्या ४,०६२ वर पोहोचली आहे.


हेही वाचाः आफताबला कोर्टात घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला, पोलिसांकडून हवेत गोळीबार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -