आफताबला कोर्टात घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला, पोलिसांकडून हवेत गोळीबार

shraddha walkar murder case accused aftab poonawala van attacked with sword in delhi video

श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्याकांडातील आरोप आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे. मुंबईसह अनेक शहरात श्रद्धाच्या हत्येप्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अशा परिस्थितीत आफताबला पॉलिग्राफीनंतर तुरुंगात पोलिसांच्या ज्या व्हॅनने घेऊन जात होते, त्या व्हॅनवर संतप्त जमावाने जोरदार हल्ला केला. सोमवारी झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी काही जणांनी तलवारी घेऊन आफताब असलेल्या पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला, रोहिणीतील एफएसएलच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

आफताबला पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून जेलमध्ये नेण्यात येत होते, यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान हे हल्लेखोर हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला जात आहे. या संतप्त जमावाने आफताब पोलिसांच्या ज्या गाडीत बसला होता, त्यावर चढून हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित पोलिसांनी संपप्त जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यानंतर व्हॅन जेलच्या दिशेने रवाना झाली.

आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या करत तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले तसेच याची दुर्गंधी येऊ नये म्हणून तो घरात अगरबत्ती आणि परफ्यूमचा वापर करत होता. मुंबईतील श्रद्धा वालकर खून प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला ताब्यात घेतले.


संजय राऊतांना पुन्हा होणार अटक? ‘या’ प्रकरणात बेळगाव कोर्टाकडून समन्स जारी