घरमहाराष्ट्रराज्यात करोनाचे २३४५ नवे रुग्ण

राज्यात करोनाचे २३४५ नवे रुग्ण

Subscribe

चोवीस तासांत ६४ जणांचा मृत्यू

राज्यात गुरुवारी २३४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४१,६४२ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुरुवारी १४०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ११ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात गुरुवारी ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून त्यामध्ये मुंबई ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ३६ पुरुष तर २८ महिला आहेत. ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

- Advertisement -

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,१९,७१० नमुन्यांपैकी २,७८,०६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१,६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५,८९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६४.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,३७,३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६,८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -