घरमहाराष्ट्रधक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच वाढदिवसाच्या दिवशीच केली आत्महत्या

धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच वाढदिवसाच्या दिवशीच केली आत्महत्या

Subscribe

कोरोनाहा बरा होणारा आजार असल्याचे कित्येक डॉक्टरांकडून सांगितले जात असतानाही कोरोनाच्या भितीपोटी बऱ्याच जणांना आपला जीव संपवल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे पाहायला मिळाले. असाच एक धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातून समोर आला आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने सांगली जिल्ह्यातील तरुणानं वाढदिवसादिनीच आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथे राहणाऱ्या वयवर्ष २८ असणाऱ्या निखील लक्ष्मण भानुसे या तरुणाने आपला जीव संपवला आहे. निखील हा व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होता. चार दिवसांपूर्वीच त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून तो अस्वस्थ होताच आणि नैराश्य आल्याने त्यानं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

प्राथमिक माहितीनुसार, निखीलचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. कोरोनाची भीती मनात बसल्यानं त्यानं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलंलं. बुधवारी रात्री घरासमोर गळफास लावून त्यानं आत्महत्या केली. याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात राज्यात एकूण ६ हजार ६७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासात ८ हजार ६०२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या ६१,८१,२४७ झाली आहे. राज्यात सध्या एकूण १,०६,७६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात ५,८०,७७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात मागील २४ तासात ६,०६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ५९,४४,८०१ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -