घरठाणेधक्कादायक! बदलापुरातील कोंडेश्वरमध्ये बुडून ४ मुलांचा मृत्यू

धक्कादायक! बदलापुरातील कोंडेश्वरमध्ये बुडून ४ मुलांचा मृत्यू

Subscribe

बदलापुरातील कोंडेश्वरमध्ये बुडून ४ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच येथील स्थानिक ग्रामस्थांनी या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची चौकशी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह ताब्यात घेत बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घाटकोपरहुन स्वयंम मांजरेकर (१९), आकाश झिंगा (१९), सुरज साळवे (१९), लिनस उच्चपवार (१९) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. यांच्यापैकी एक जण पाण्यात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या इतर मित्रांनी त्याला वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे ऐन दिवाळीत मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

मृत मुलांसोबत आलेला त्यांचा मित्र प्रतीक हाटेने पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा : ‘महाभारतातील जिहाद’वरून गदारोळ, शिवराज पाटलांचं स्पष्टीकरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -