घरठाणेचार हजार पोलिसांकडून ठाण्यात करडी नजर

चार हजार पोलिसांकडून ठाण्यात करडी नजर

Subscribe

गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, शहर पोलिसांचे आवाहन

ठाणे । सरत्या वर्षाला निरोप देण्याकरीता आणि नववर्षाचे स्वागत करण्याकरीता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी जनसमुदाय एकत्र जमण्याची शक्यता असल्याने शहर पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. यासाठी, 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. याशिवाय,कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी मुखपट्टीचा वापर करावासार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी मुखपट्टीचा वापर करावा. नववर्षाचे स्वागत उत्साहाने शांततेत करावे तसेच फटाक्यांची आतिषबाजी करताना ध्वनी व वायूप्रदूषणाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट या पाच परिमंडळात नववर्षाच स्वागत करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नागरीक एकत्र येत असतात. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन महत्वाचे,गर्दीच्या ठिकाणी व रहदारीच्या रस्त्यांवर नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 500 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार तसेच शहर वाहतुक शाखेकडुन विविध महत्वाच्या चौकात 42 पोलीस अधिकारी, 400 पोलीस अंमलदार, विशेष शाखेकडुन नागरी गणवेशात 70 अधिकारी व अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी हॉटेल्स, लॉजेस, ढाबे, लॉन्स या परिसरात नागरी गणवेशातील विशेष तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची निगराणी राहणार आहे.

- Advertisement -

तर नववर्ष स्वागता दरम्यान काही संशयीत हालचाली व संशयीत वस्तु दिसुन आल्यास तात्काळ स्थानिक पोलीसांशी अथवा नियंत्रण कक्ष, ठाणे शहर येथे संपर्क साधावा. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्‍या हुल्लडबाजांवर नजर ठेवण्याकरीता व कारवाई करीता भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. तर, उत्सवा दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करताना ध्वनी व वायूप्रदूषणाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असेही आवाहन केले आहे.

याचबरोबर उत्सवा दरम्यान मद्यसेवन करून वाहने चालविणार्‍या वाहन चालकांविरुद्ध ब्रेथ अनालायझरचा
वापर करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांनी मुखपट्टीचा वापर करावा. सर्व नागरीकांनी नववर्षाचे स्वागत उत्साहाने शांततेत करावे असे आवाहन ठाणे शहर
सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.

- Advertisement -

विनयभंगाच्या घटनेबाबत निर्भया पथके
महिला छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथके गस्तीकरीता नेमण्यात आलेली असुन विशेष शाखेकडुन नागरी गणवेशातील पथके गस्तीकरीता नेमण्यात आली आहेत. खाडी किनारी जेट्टी लॅन्डीग पॉईन्ट भागात गस्त ठेवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -