घरमहाराष्ट्रलम्पीवर सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात लस येणार, राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

लम्पीवर सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात लस येणार, राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

Subscribe

राज्यातील 33 जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार 72 गोवर्गीय जनावरे लम्पी आजाराने बाधित झाले, मात्र वेळेत 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याने पशुधनाचा मृत्यू रोखता आला. यात सप्टेंबर 2023 पर्यंत महाराष्ट्र लम्पीविरोधातील लसीकरणात स्वयंपूर्ण होणार आहे. तसेच ही लस राज्यातचं तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली आहे.

प्रश्नोतराच्या तासादरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लम्पी आजाराबाबत प्रश्न उपस्थित केल्या. ज्यावर मंत्री विखे पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. यावेळी विखे पाटील म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यात लम्पी आजार बळावत होता. यावेळी केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सुचनांनुसार, जनावराचे तातडीने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला, राज्य सरकारने यावेळी वेगाने 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याचे विशिष्ट पद्धतीचा अवलंब करत लसीकरण पूर्ण केले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले, राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्वीकारल्या आहेत.

- Advertisement -

पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासराला 16 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

कायमस्वरूपी विमा योजना करणार सुरु

राज्यात पशुधनाला अनेक आजरांचा सामना करावा लागतो. यात लाखो रुपयांचे पशुधन दगावण्याची शक्यता असते. यामुळे पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.


ज्यांची कमावण्याची हिंमत नाही ते सगळं चोरतायत; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -