घरमहाराष्ट्रराज्यात ५,९०२ नवे रुग्ण, १५६ जणांचा मृत्यू

राज्यात ५,९०२ नवे रुग्ण, १५६ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४३,७१० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे.

राज्यात ५,९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोेरोना बाधित रुग्णांची संख्या १६,६६,६६८ झाली आहे. राज्यात १,२७,६०३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४३,७१० वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे.

राज्यात १५६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३३, ठाणे ७, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ६, नाशिक ३, पुणे ९, पिंपरी चिंचवड मनपा १२, सोलापूर ११, सातारा ७, सांगली ७, नांदेड ८, नागपूर १० यांचा समावेश आहे. आज ७,८८३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४,९४,८०९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८८,३७,१३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६६,६६८ (१८.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,३३,६८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -