घरमहाराष्ट्रबुलडाण्यात सुतळी बॉम्बने घेतला चिमुकल्याचा जीव

बुलडाण्यात सुतळी बॉम्बने घेतला चिमुकल्याचा जीव

Subscribe

फटाक्याच्या स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्याच्या पिंपळगाव सरई गावामध्ये ही घटना घडली आहे.

दिवाळी सुरु झाली सुध्दा नाही तरी देखील फटाके वाजवायला सुरुवात झाली. फटाका वाजवताना एक चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यामध्ये घडली आहे. सुतळी बॉम्बच्या स्फोटामध्ये बुलडाण्याच्या पिंपळगाव सराईमध्ये राहणाऱ्या ६ वर्षाच्या यश गवते याचा मृत्यू झाला आहे. यश मंगळवारी घराबाहेर रेतीच्या ढिगाऱ्यावर खेळत होता. त्याच्याजवळ असलेल्या सुतळी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे यशच्या तोडांला आणि छातीला गंभीर दुखापत झाली.

उपचारापूर्वी मृत घोषीत केले

जखमी झालेल्या यशला त्याच्या कुटुंबियांनी ताबडतोब सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी यशला मृत घोषीत केले. या घटनेनंतर बुलडाण्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दिवाळीच्या काळात सर्रास वाजवल्या जाणाऱ्या सुतळी बॉम्बने यशचा जीव घेतला. यशच्या मृत्यूमुळे संपूर्ण पिंपळगाव सराईमध्ये शोकळा परसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -