Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाचा कहर! अमरावती विद्यापीठात ५६ कर्मचारी पॉझिटिव्ह, यापैकी १३ कर्मचाऱ्यांचं अख्खं कुटुंब...

कोरोनाचा कहर! अमरावती विद्यापीठात ५६ कर्मचारी पॉझिटिव्ह, यापैकी १३ कर्मचाऱ्यांचं अख्खं कुटुंब बाधित!

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अमरावती विद्यापीठात कोरोनाचा अधिक शिरकाव होत आहे. नुकतीच विद्यापीठाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी केली. ३०० पैकी ५६ विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायकबाब म्हणजे १३ कर्मचाऱ्याचं पूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

अमरावती विद्यापीठातून पाच जिल्ह्यांचा शैक्षणिक कारभार पाहिला जातो. मात्र कोरोनाच्या धोक्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काय म्हणाले अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख?

- Advertisement -

‘संत गाडगेबाब अमरावती विद्यापीठामध्ये जवळपास ३००च्या आसपास कर्मचारी आहेत. मागील दोन दिवस कॅम्प लावून सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्या. यामध्ये ५६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या ५६ कर्मचाऱ्यांमधील १३ कर्मचाऱ्यांचे अख्खं कुटुंब कोरोनाबाधित आहे’, अशी माहिती हेमंत देशमुख यांनी दिली.

अशाप्रकारे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे अमरावती कोरोनाचे हॉटस्पॉट झालं आहे. मागील काही दिवसांपासून ७०० ते ८०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे अमरावतीची चर्चा फक्त राज्यातच नाही तर देशभरात होत आहे. कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे अमरावतीमध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ८ मार्चपर्यंत अमरावतीत लॉकडाऊन असणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Live Update: MBBSची अंतिम परीक्षा होणार ऑफलाईन


 

- Advertisement -