घरताज्या घडामोडीCoronavirus: डॉक्टराने भीती दाखवल्यामुळे वृद्धाने केली आत्महत्या

Coronavirus: डॉक्टराने भीती दाखवल्यामुळे वृद्धाने केली आत्महत्या

Subscribe

थंडी-तापाच्या आजारासाठी दवाखान्यात गेलेल्या वृद्धाला डॉक्टरांनी 'तुम्हाला कोरोना असू शकतो', असे सांगितल्याने त्या वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी शहरात घडली आहे.

थंडी-तापाच्या आजारासाठी दवाखान्यात गेलेल्या वृद्धाला डॉक्टरांनी ‘तुम्हाला कोरोना असू शकतो’, असे सांगितल्याने त्या वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी शहरात घडली आहे. वृद्धाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात म्हटले आहे की, ‘डॉक्टरने भीती दाखवल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’. आज पहाटे भोसरी येथे ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

नेमके काय घडले?

भोसरी येथील गव्हाणे येथे राहणारे शिवाजी मारुती होळकर (६८) यांना थंडी, ताप आल्यामुळे ते दवाखान्यात गेले होते. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी हा कोरोनाही असू शकतो, असे सांगितले. हे ऐकताच ते घाबरे आणि त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

पोलिसांना तपासात होळकर यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे की, ‘गेल्या आठ दिवसांपासून मला थंडी-ताप येत होता. त्यामुळे जवळच्या एका खासगी दवाखान्यात गेलो होतो. तिथल्या डॉक्टरांनी मला कोरोनाची लक्षणे असल्याची भीती दाखवली. त्या भीतीपोटी मी आत्महत्या करीत आहे’, अशी चिठ्ठी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस येताच नातेवाईकांनी होळकर यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू: जम्बो हॉस्पिटलच्या तक्रारी खपवून घेणार नाही – अजित पवार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -