घरCORONA UPDATEराज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजारावर; तर ७२२ जण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजारावर; तर ७२२ जण कोरोनामुक्त

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ हजारवर iगेला असून एकूण ७२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात ५५२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आता एकूण रुग्ण संख्या ५ हजार २१८ झाली आहे. तर १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४ हजार २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ५ हजार २१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज १९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. तर आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत. तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये (६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील

मुंबई महानगरपालिका : ३ हजार ४५१ रुग्ण तर १५१ जणांचा बळी
ठाणे: २२ कोरोनाबाधित तर २ जणांचा मृत्यू
ठाणे मनपा : १५० कोरोनाबाधित तर ४ जणांचा मृत्यू
नवी मुंबई मनपा: ९४ कोरोनाबाधित तर ३ जणांचा मृत्यू

- Advertisement -

कल्याण डोंबिवली मनपा : ९३ जण कोरोनाबाधित तर २ जणांचा बळी
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ६
मीरा भाईंदर मनपा: ८१ कोरोनाबाधित तर २ जणांचा मृत्यू
पालघर: १८ कोरोनाबाधित तर १ चा मृत्यू
वसई विरार मनपा: १११, ३ मृत्यू
रायगड: १६ कोरोनाबाधित
पनवेल मनपा: ३४ कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू
ठाणे मंडळ एकूण: ४ हजार ०७७ तर १६९ जणांचा मृत्यू
नाशिक: ४ कोरोनाबाधित
नाशिक मनपा: ६ कोरोनाबाधित
मालेगाव मनपा: ८५ कोरोनाबाधित, ८ – मृत्यू
अहमदनगर: २१ कोरोनाबाधित, २ – मृत्यू
अहमदनगर मनपा: ८ कोरोनाबाधित,
धुळे: २ कोरोनाबाधित, (१) – मृत्यू
धुळे मनपा: २ कोरोनाबाधित
जळगाव: १ कोरोनाबाधित
जळगाव मनपा: २ कोरोनाबाधित, (१) – मृत्यू
नंदूरबार: ४ कोरोनाबाधित
नाशिक मंडळ एकूण: १३५ कोरोनाबाधित तर १२ जणांचा मृत्यू
पुणे: १९ कोरोनाबाधित , (१) – मृत्यू
पुणे मनपा: ६४६ कोरोनाबाधित, (५२) – मृत्यू
पिंपरी चिंचवड मनपा: ५१ कोरोनाबाधित, (२) – मृत्यू
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: २५ कोरोनाबाधित, (२) – मृत्यू
सातारा: १३ कोरोनाबाधित, (२) – मृत्यू

पुणे मंडळ एकूण: ७५४ कोरोनाबाधित, (५९) – मृत्यू

कोल्हापूर: ६ कोरोनाबाधित,
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ कोरोनाबाधित, (१) – मृत्यू
सिंधुदुर्ग: १ कोरोनाबाधित
रत्नागिरी: ८ कोरोनाबाधित (१) – मृत्यू
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ कोरोनाबाधित (२) – मृत्यू
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ३४ कोरोनाबाधित (३) – मृत्यू
जालना: १ कोरोनाबाधित
हिंगोली: १ कोरोनाबाधित
परभणी: ०
परभणी मनपा: १ कोरोनाबाधित
औरंगाबाद मंडळ एकूण: ३८ कोरोनाबाधित, (३) – मृत्यू
लातूर: ८ कोरोनाबाधित
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ कोरोनाबाधित
बीड: १कोरोनाबाधित
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०

लातूर मंडळ एकूण: १२ कोरोनाबाधित

अकोला: ७ कोरोनाबाधित, (१) – मृत्यू
अकोला मनपा: ९ कोरोनाबाधित
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ कोरोनाबाधित (१) – मृत्यू
यवतमाळ: १६कोरोनाबाधित
बुलढाणा: २१ कोरोनाबाधित (१)- मृत्यू
वाशिम: १ कोरोनाबाधित
अकोला मंडळ एकूण: ६० कोरोनाबाधित (३) – मृत्यू
नागपूर: ३
नागपूर मनपा: ७६ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ८२ कोरोनाबाधित (१) – मृत्यू
इतर राज्ये: १५ कोरोनाबाधित, (२) – मृत्यू

एकूण: ५२१८ कोरोनाबाधित, (२५१) – मृत्यू


हेही वाचा – लॉकडाऊनचा फटका : घरी जाता येत नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -