घरठाणेकल्याण परिमंडळात चोरीस गेलेला ८ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

कल्याण परिमंडळात चोरीस गेलेला ८ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

Subscribe

डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात चोरीचे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच घरफोड्या, चोऱ्या, वाटमाऱ्या, गहाळ, आदी संदर्भातील तक्रारी स्थानिक पोलिस ठाण्यांतून दाखल करण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास करून गुन्हेगारांकडून हस्तगत केलेला ७ कोटी ९४  लाखांचा मुद्देमाल रायझिंग-डेच्या पार्श्वभूमीवर मूळ मालकांना परत देण्यात आला.

डोंबिवली विभागात मागील पाच महिन्यांपासून २१.६ तोळे वजनाचे सोने, ६ कोटीची रोकड, ११  मोबाईल – लॅपटॉप, १२ वाहने, १४ टन सळई, तसेच कल्याण विभागात ४१ लाख ५५ हजार किमतीचे सोन्या व चांदीचे दागिने, २२ लाखांची रोकड, ४ मोबाईल – लॅपटॉप, ९  वाहने असा एकूण ७  कोटी ९४  लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सोमवारी रेझिंग-डे निमित्त सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते हा सर्व मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला.

- Advertisement -

यावेळी अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्यासह संबंधित आठही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -