घरताज्या घडामोडीआनंदाची बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत ९८ टक्के पाणीसाठा

आनंदाची बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत ९८ टक्के पाणीसाठा

Subscribe

मुंबईत सध्या गणेशोत्सव व आनंदोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. तर दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या काही दिवसात चांगला पाऊस पडल्याने तलावांत १४ लाख दशलक्ष लिटरपेक्षाही जास्त म्हणजे जवळजवळ ९८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार, हा पाणीसाठा मुंबईला पुढील जवळजवळ ३६८ दिवस म्हणजेच पुढील ८ सप्टेंबर २०२३ पर्यन्त पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील वर्षी निम्म्या पावसाळ्यापर्यन्त पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार नाही.

- Advertisement -

मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अद्यापही पावसाचा शेवटचा महिना बाकी असून त्या कालावधीत आणखीन चांगला पाऊस पडल्यास तलावांतील पाणीसाठा शंभर टक्केपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पावसाळ्याच्या प्रारंभी जून महिन्यात मुंबईकरांना अपेक्षित पाऊस तलाव क्षेत्रात न पडल्याने मुंबई महापालिकेने मुंबईकरांवर १० टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. मात्र जुलै महिन्यापासून ते ऑगस्ट अखेरपर्यंत सातही तलावांच्या क्षेत्रात चांगला पाऊस पडला. त्यामुळे सातपैकी चार तलाव भरले. तर उर्वरित तीन तलाव हे ९८ टक्के भरले आहेत.

मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले

सध्या सर्व सात तलावांत मिळून एकूण १४ लाख १७ हजार २१७ दशलक्ष लिटर इतका म्हणजे पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा आहे. त्याशिवाय पावसाचा आणखीन एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही.

- Advertisement -

सात तलावातील पाणीसाठा, टक्केवारी –

तलाव पाणीसाठा टक्केवारी

उच्च वैतरणा २,२३,१९० ९८.३०

मोडकसागर १,२८,९२५ १००.००

तानसा १,४३,७६९ ९९.१०

मध्य वैतरणा १,८४,२९२ ९५.२३

भातसा ७,०१,३९९ ९७.८२

विहार २७,६९८ १००.००

तुळशी ७,९४४ ९८.७४

एकूण १४,१७,२१७ ९७.९२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -