घरक्रीडारवी शास्त्रींनी टॉस टाईम.., म्हणताच रोहित शर्माला आवरले नाही हसू, व्हिडीओ व्हायरल

रवी शास्त्रींनी टॉस टाईम.., म्हणताच रोहित शर्माला आवरले नाही हसू, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

आशिया कप २०२२ मध्ये भारत-पाकिस्तान संघात दुसऱ्यांदा सामना होत आहे. भारतीय संघाचा पाकिस्तानविरूद्धचा पहिला सामना मागील रविवारच्या दिवशी झाला होता. तर आजच्या दिवशी दुसरा सामना दोन्ही संघांमध्ये खेळवला जात आहे. आशिया कपची सुपर 4 फेरी सुरु झाली आहे. सर्व संघ परस्पराविरुद्ध प्रयेकी एक सामना खेळणार आहेत. दरम्यान, नाणेफेकीच्या वेळी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री समालोचन करत आहेत. परंतु त्यांनी एका खास अंदाजात समालोचन केल्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला हसू आवरले नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे. नाणेफेकीवेळी रवी शास्त्री म्हणाले की, ग्रीन जर्सीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि ब्लू जर्सीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा माझ्यासोबत आहे. परंतु त्यांनी ही घोषणा बॉक्सिंगच्या सामन्यावेळी केली जाते, त्याप्रमाणे केली. त्यामुळे शास्त्रींचे बोलणे ऐकून रोहित शर्मा आणि बाबर आझमला हसू आवरले नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने संघात मोठा बदल केला आहे. शाहनवाज दहानीच्या जागी हसन अलीला संधी देण्यात आली आहे. तर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा : भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा भिडणार, पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11 टीम?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -