घरताज्या घडामोडीबेस्टवरील हल्लाबोलमध्ये भाजपची गटबाजी; मुंबई अध्यक्षांनी आंदोलन केले हायजॅक

बेस्टवरील हल्लाबोलमध्ये भाजपची गटबाजी; मुंबई अध्यक्षांनी आंदोलन केले हायजॅक

Subscribe

बेस्टच्या वीज ग्राहकांना करण्यात आलेल्या वाढीव आवाजवी वीज बिलांची आकारणी रद्द करण्याबाबत भाजपने बेस्ट भवनावर हल्लाबोल केला. यावेळी ग्राहकांना टप्प्याटप्याने वीज बिल भरण्याची मुभा बेस्ट उपक्रमाने दिल्याचे महाव्यवस्थापकांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील आमदार आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला सांगितले. सुरुवातीला भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार होते. पण या आंदोलनात मंगल प्रभात लोढा आणि आमदार राहुल नार्वेकर यांनी या आंदोलनाचा असा ताबा घेतला की माजी बेस्ट समिती अध्यक्ष असलेल्या प्रभाकर शिंदे यांना तोंडातून एक शब्द काढण्याची संधी मिळाली नाही.

वाढीव अवाजवी वीज बिलाची आकारणी रद्द करून सर्व सामान्य मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने दिलासा द्यावा यासाठी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक गटाचा बेस्ट महाव्यवस्थापक आणि बेस्ट प्रशासनावर हल्लाबोल करणार असल्याचा संदेश महापालिका भाजपा कार्यालयातून जारी करण्यात आला होता. परंतु या संदेशात भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नव्हता. परंतु आयत्या वेळी नगरसेवकांसह केले जाणारे आंदोलन लोढा यांनी हाती घेतले. पण त्यानंतर महाव्यवस्थापक यांच्यासह झालेल्या चर्चेत लोढा आणि राहुल नार्वेकर यांनीच बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढीव वीजदरांस त्वरित स्थगिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली. तसेच बेस्ट वीज बिल भरण्यासाठी मुदत तथा हप्ते देण्यात आलेत, पण तरीही वीज जोडणी खंडित करण्यात येईल, असे एसएमएस बेस्टने पाठविले आहेत. त्याबाबत महाव्यवस्थापक यांचे लक्ष वेधत सध्या चालू महिन्याचे बिल घ्यावे आणि वीज जोडणी खंडित करण्यात येणार नाही, असा लेखी एस.एम.एस त्वरित पाठवावे, अशी मागणी करण्यात आली. लाॅकडाऊन काळातील वीज देयक आणि त्यावरील शासकीय कर यात माफी, १०० युनिट मोफत वीज याबाबत राज्य शासनाकडून आदेश प्राप्त होईपर्यंत सदर बिल आकारणी भरणा करणेस सूट देण्याची मागणी त्यांनी महाव्यवस्थापक यांच्याकडे केली.

यावेळी झालेल्या आंदोलनात भाजप नगरसेवक विनोद मिश्रा, अतुल शाह, सुषम सावंत, राजेश्वरी शिरवडकर, नेहल शाह, जोत्स्ना मेहता, सरिता पाटील, आकाश पुरोहित, सुनील गणाचार्य, नाना आंबोले, शीतल गंभीर, स्वप्ना म्हात्रे, कमलेश यादव आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -