घरक्राइमरोलेट खेळणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

रोलेट खेळणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

मोबाईल फोनवरील फनगेम नावाचे अ‍ॅपवर रोलेट खेळण्यासाठी पासवर्ड देऊन जुगार खेळताना व खेळविताना मिळून आलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई राठोड यांच्या फिर्यादीनुसार, संशयिअत आरोपी मनोज लुबानसिंग मांडवडे (वय ३१, रा. सिडको) हा ९ डिसेंबर रोजी सायंकाळी दुर्गानगरकडे जाणार्‍या चौकातील रस्त्यालगत स्वत:च्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या त्याच्या मोबाईल फोनवरील गेम अ‍ॅपवर रोलेट जुगार खेळण्यासाठी आयडी पासवर्ड देऊन रौलेट नावाचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मनोज मांडवडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -