घरक्राइमअग्निवीर प्रशिक्षणात जवानाचा उष्माघाताने बळी; तुम्हीही घ्या काळजी

अग्निवीर प्रशिक्षणात जवानाचा उष्माघाताने बळी; तुम्हीही घ्या काळजी

Subscribe

नाशिक : महाराष्ट्रभूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये अग्निवीर भरतीअंतर्गत प्रशिक्षण घेणार्‍या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या जवानाचा मृत्यू झाला. हर्षल संजय ठाकरे (वय २१, मूळ रा. धुळे) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी प्रशिक्षण कालावधीत जवान हर्षल ठाकरे (आर्मी नं. आय-३४५१७४६) यांना उलट्या व तापाचा त्रास सुरू झाला. त्रास होत असल्याने लान्स नायक नरेंद्र सिंग यांनी त्यांना आर्टिलरी सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले. डॉ. भरत शिंदे यांनी ठाकरे यांची तपासणी करत मृत घोषित केले. याप्रकरणी आर्टिलरी सेंटरतर्फे लेखी माहितीद्वारे पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी हर्षल ठाकरे यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. इतर जवानांची आरोग्य स्थिती व हर्षल ठाकरे यांना उष्माघाताचा त्रास का झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पानसरे करत आहेत.

- Advertisement -
उष्माघात म्हणजे काय?

वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार. आपल्या शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७ अंश सेल्सिअस (९८.६ अंश फॅरनहाईट) असते. हे तापमान खूप वाढल्याने किंवा कमी झाल्याने मेंदूवर, रक्ताभिसरणावर आणि शरीरातल्या रसांवर (एन्झाइम्सवर) प्राणघातक दुष्परिणाम होऊ  शकतात. ते टाळण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी एक वातानुकूलन प्रणाली कार्यरत असते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही यंत्रणा पूर्ण कोलमडते. परिणामत: त्या व्यक्तीला घाम येणे, मळमळ, उलटयम, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तपमान अचानक कमी होणे, चक्कर येणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसतात. वेळेत उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होते.

उष्माघाताची लक्षणे काय?

संपूर्ण शरीरच उष्माघाताचे परिणाम विविध लक्षणांद्वारे दाखवण्यास सुरुवात करते. थकवा, चक्कर, निरुत्साही वाटणे, अस्वस्थता येणे ही सुरुवातीची लक्षणे. ही लक्षणे लवकर ओळखून उपाय केले नाहीत तर तीव्र लक्षणे दिसू लागतात. त्वचा कोरडी पडते, जीभ आत ओढली जाते. रक्तदाब वाढतो. मानसिक बैचेनी वाढते, शरीराचे तापमान वाढते. काही वेळा शुद्धही हरपू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -