घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआमदारांनी केलेले आरोप तथ्यहीन; हे पिंगळेचे षडयंत्र; धमकीच्या आरोपवर शिवाजी चुंभळे यांचे...

आमदारांनी केलेले आरोप तथ्यहीन; हे पिंगळेचे षडयंत्र; धमकीच्या आरोपवर शिवाजी चुंभळे यांचे स्पष्टीकरण

Subscribe

नाशिक : इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी खंडन केले आहे. बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून पिंगळे गटाने केलेले राजकीय षडयंत्र असल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी माहिती दिली.

आमदार खोसकर यांनी शुक्रवार (ता.२२) रोजी नाशिक तालुका पोलिस ठाणे गाठत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे व त्यांचे पुत्र अजिंक्य चूंभळे यांनी मोबाइलवरून धमकी दिल्याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.मतदारसंघात फिरू नको, माझ्या बापाच्या नादी लागू नको, तू अजून आम्हाला ओळखले नाही. आमच्या नादी लागल्यावर काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार कर अशा पद्धतीने वेळोवेळी धमकी दिली जात असल्याचे आमदार खोसकर यांनी म्हटले होते.

- Advertisement -

त्यावर शिवाजी चुंभळेनी आमदार खोसकर यांनी केलेले आरोपाचे खंडन करीत, तथ्यहीन असल्याचे सांगितले. आमदारांना धमकी देण्याचा संबंधच येत नाही, या सर्व षडयंत्रामागे माजी सभापती देविदास पिंगळे हेच असल्याचा आरोप माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे. आमदार हिरामण खोसकर खोट बोलत आहेत असा आरोपही करत खोसकर यांना जिल्हा परिषदेला मदत केली होती व त्या नंतर इगतपुरी मतदार संघात आमचे नातगोत मोठे असल्याने आमदारकीच्या वेळी देखील मदत केली होती, तसेच माझ्या मुलाने आमदारांना फोन केला होता.जे बोलणं झालं त्याची क्लिप आमच्याकडे असून ती आम्ही पोलीसाना दाखविली व ऐकवली आहे.

तर अजिंक्य चुंबळे म्हणाले, आमदार एखाद्या कलाकारा पेक्षा चांगले नट आहेत, आम्ही त्यांना आमदारकीच्या वेळी मदत केली होती. त्या बदल्यात मदत करा एवढंच बोललो. धमकी दिली असेल तर पुरावे द्यावेत, आमदारांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याने आमच्या बद्दल बदनामी सुरू केली आहे असेही चुंभळे यांनी म्हंटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -