घरताज्या घडामोडीकट रचणार्‍याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली, आरोपांवर अब्दुल सत्तार यांचा खुलासा

कट रचणार्‍याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली, आरोपांवर अब्दुल सत्तार यांचा खुलासा

Subscribe

औरंगाबाद – मंत्रिपद न मिळालेला माझ्याच पक्षातील एक नेता माझ्याविरोधात कट करत आहे. यासंदर्भात मी केलेल्या वक्तव्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मला आज जास्त वेळ मिळाला नाही, पण मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडून सर्व माहिती घेतली आहे, असा खुलासा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत मी कुठल्याही नेत्याचे नाव घेतले नाही, परंतु माध्यमांना माझ्याबाबत माहिती देणारा नेताच माझ्याविरोधात कट रचत आहे. हा नेता कोण आहे, हे तुम्हाला ठावूक आहे, असे मी त्यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही त्याची माहिती घेणार असल्याचे आश्वासन दिले, असे अब्दुल सत्तार म्हणाले. सिल्लोड कृषी महोत्सवाला शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट का नाही आले, असे विचारताच हे काही आमदार-खासदारांचे संमेलन नाही. काही नेते सोडले तर माझ्यावर कोणी नाराज नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी सिल्लोडला येणार आहेत, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर राज्यातील टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकार्‍यांना दिलेले टार्गेट, गायरान जमिनीच्या प्रकरणावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या सर्व आरोपांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहेत. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोपही माझ्यावर आता करण्यात आले आहेत. असे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आरोप अब्दुल सत्तार यांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -